Pune Job Fair 2023 | ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत’ जेजुरी येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Job Fair 2023 | ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplya Dari ) अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार (Pandit Dindayal Upadhyay Job Fair ) मेळाव्याचे २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता जेजुरी (Jejuri) पालखी तळ (ता. पुरंदर – Purandar) येथे आयोजन करण्यात आले आहे. (Pune Job Fair 2023)

या महारोजगार मेळावाद्वारे विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांना नोकरीची विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने, त्यांच्यासह इतर सर्वच इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावेत. (Pune Job Fair 2023)

मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आवश्यकतेनुसार संक्षिप्त परिचयासह अर्ज व आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जास्तीत जास्त नोकरीइच्छूक उमेदवारांनी २३ जुलै रोजी सकाळी १० वा. महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे. (Pune Rojgar Melava 2023)

Web Title :  Pune Job Fair 2023 | Organized Maharojgar Mela at Jejuri under ‘Sasan Apya Dari’ Abhiyan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Train Cancel | मुंबई-पुणे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, पावसामुळे ‘या’ ट्रेन रद्द

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले- ‘सत्तेची साठमारी…’ (व्हिडिओ)

Chandrakant Patil On Pune Police | सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक

Pune Police News | CP रितेश कुमार, Jt CP संदीप कर्णिक यांचा ‘ऑल आऊट’वर भर ! ‘कोम्बिंग’मध्ये 1727 गुन्हेगार ‘घेरले’; कोथरूडमध्ये 2 मोस्ट वॉन्टेड ‘हेरले’ (Video)