Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : भाजपला मोठा धक्का ! स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Kasba Bypoll Election | पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची (Kasba and Chinchwad Bypoll Elections) घोषणा झाली असून यात सत्ताधारी भाजपसोबतच (BJP) महाविकास आघाडी (MVA) देखील पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. त्यातच कसबा पोटनिवडणुकीच्या (Pune Kasba Bypoll Election) पार्श्वभूमीवर भाजपसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशिद शेख (Rashid Shaikh) यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रशिद शेख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

 

रशिद शेख यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पुणे केन्टोन्मेंटची जागा काँग्रेस पक्षाला अगदी थोडक्यात गमवावी लागली होती. आता रशीद शेख यांची पुन्हा एकदा घरवापसी झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा काँग्रेसची ताकद पुण्यात वाढणार असे बोलले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत रशिद शेख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi), आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte), शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), माजी शहराध्यक्ष अभय छाजेड (Abhay Chhajed), आदी काँग्रेस नेते उपस्थित होते. (Pune Kasba Bypoll Election)

दरम्यान, रशिद शेख यांचे बंधू रफिक शेख (Rafiq Shaikh) हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या लोहियानगर-कासेवाडी प्रभागातील जवळपास २० हजारांहून अधिक मतदार कसबा विधानसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे रशिद शेख यांच्या काँग्रेस प्रवेशाचा फटका भाजपला बसू शकतो, असे बोलले जात आहे. यावेळी बोलताना रशिद शेख यांनी काँग्रेस उमेदवाराला निवडूण आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

 

पुणे दौऱ्यावर असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेस पक्ष कसबा निवडणुक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले.
तसेच उमेदवार देखील आज संध्याकाळपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
उमेदवाराचे नाव जाहीर केल्यानंतर त्याचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करण्यात येईल.
असेही यावेळी जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले.

 

Web Title :- Pune Kasba Bypoll Election | Kasba by-election: Big blow to BJP! Former Chairman of Standing Committee joins Congress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sunil Kedar | सत्यजीत तांबे प्रकरणात नाना पटोले यांच्यावर कारवाई होणार का? काँग्रेस नेते स्पष्टचं बोलले; म्हणाले…

Prakash Ambedkar | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…

Pune Crime News | चोर्‍या करणार्‍या तडीपार गुन्हेगाराकडून 3 गुन्हयांची उकल; समर्थ पोलिसांची कामगिरी