Pune Kasba Peth Bypoll Election | आदित्य ठाकरे यांच्या रॅलीने पुणेकरांना जिंकले !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या रॅलीने पुणे शहरातील वातावरण ढवळून निघाले. गर्दीचा उच्चांक व प्रचंड उत्साहात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात या रॅलीने कसब्यातील (Pune Kasba Peth Bypoll Election) वातावरण ढवळून काढले.

 

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ येथील लाल महालापासून रॅलीला सुरुवात झाली. ठिकठिकाणी या रॅलीचे जोरदार स्वागत होत होते. दुतर्फा नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. फडके हौद- देवजीबाबा मठ- हमजेखान चौक- नाना चावडी चौक हिंदमाता चौक मार्गे साखळीपीर तालीम चौक येथे रॅलीचा समारोप झाला व सहा वाजता आदित्य ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम लाल महालमधील बालशिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शिवसेनेचे नेते सचिन आहेर, माजी आमदार मोहन जोशी, आदींसह महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राजेंद्र शिंदे, नागेश खडके,
संजय वाल्हेकर, विकी धोत्रे, मकरंद पठेकर, कॉंग्रेस पक्षाचे सुरेश कांबळे, दादासाहेब बोत्रे,
माजी नगरसेविका पल्लवी जावळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी उघड्या जीपमधून रॅलीला सुरुवात केली.
‘पन्नास खोके, एकदम ओके’ तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख असलेल्या ‘गद्दार शिंदे’ अशा घोषणा देत रॅलीने लाल महालपासून प्रारंभ केला.

 

काँग्रेसचे माजी मंत्री सुनिल केदार हे आदित्य ठाकरे यांच्यासमवेत जीपमध्ये बसले होते.
फटाक्यांची आतषबाजी, भगवे फुगे, तसेच भगव्या पताक्यांच्या माळांचा वर्षाव ठिकठिकाणी रॅलीच्या मार्गात होत होता.
दुचाकी गाड्यांवरील तरुण-तरुणींनी भगवे कोट परिधान केले होते.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Aditya Thackeray’s Rally Wins Pune People !!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rani Mukerji | राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर पाहताच क्षणी अंगावर येईल काटा

Shiv Thakare | मराठी चित्रपट न करण्याबद्दल शिव ठाकरेचे वक्त्यव्य; म्हणाला – ‘काही चित्रपटांसाठी माझी निवड…’

Pune Crime News | मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वानवडी पोलिसांकडुन अटक