Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : हेमंत रासनेंच्या मागे ‘सत्तेची ताकद’ तर रविंद्र धंगेकरांना जनतेचा ‘आशीर्वाद’?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली तसा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप (BJP) महायुतीने हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यामागे ‘सत्ते’चा जोर लावला असून सर्वसामान्य मतदारांनी ‘आपला माणूस’ काँग्रेस (Congress) महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या पाठीशी ताकद उभी केल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत असल्याने कसब्याची निवडणूक अगदी ‘ठासून’ होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Pune Kasba Peth Bypoll Ections)

 

आमदार मुक्ता टिळक (Late MLA Mukta Tilak) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूकिसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. प्रचाराची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात आली आहे. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपाइं चे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांचे पती शैलेश (Shailesh Tilak) अथवा मुलगा कुणाल टिळक (Kunal Tilak) यांना उमेदवारी मिळेल अशी सर्वसामन्य कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. परंतु पक्षाने सलग चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष पदी राहिलेल्या हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने भाजप मध्येच अंतर्गत नाराजी सुरू झाली . तर या निवडणुकीने सत्तेचे गणित ठरणार नाही. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने कामे केली असतील तर टिळक कुटुंबियांना निवडून आणण्यात भाजपच्या शहर आणि राज्यातील नेत्यांना का अवघड वाटले? असा प्रश्न उपस्थित करत भाजपचा मतदार देखील नाराज झाला आहे. अशातच कोथरूड मधून विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचे तिकीट कापण्यात आले तर कसब्यात टिळक कुटुंबियांवर देखील अन्याय केला, यामुळे भाजपचा हक्काचा मतदार देखील नाराज झाला. (Pune Kasba Peth Bypoll Election)

यामुळेच महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध केल्यास हेमंत रासने यांची उमेदवारी बदलू असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना करावे लागले, यातच सर्व काही आले.

 

प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रचार सुरू झाला. त्यानंतरही नाराजी दिसू लागली आहे. कसबा धोक्यात आल्याचे निदर्शनास आल्याने अगदी केंद्रासोबतच राज्यातील मंत्र्यांना प्रचारासाठी पाचारण करावे लागले असून पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करण्याची वेळ भाजपवर आली आहे.

 

दुसऱ्या टप्प्यातही उमेदवार पिछाडीवर असल्याचे संकेत मिळू लागल्याने आता मनसे, उद्योजक, व्यापारी आणि
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची वेळ भाजप वर आल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.
यासोबतच विरोधकांच्या विरोधात ‘ शुक्ला’ अस्त्र आणि ‘लक्ष्मी ‘ दर्शनाचे प्रयोग सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सर्वसामन्य कार्यकर्ते असून
कसबा मतदार संघात हाकेला धावणारा ‘आपला माणूस’ अशी त्यांची प्रतिमा आहे.
त्यामुळेच ते शिवसेना, मनसे आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणूनही सलग पाचवेळा महापालिकेत निवडून आले आहेत.
कायमच विरोधी पक्षातून निवडून आल्यानंतरही अगदी शेवटच्या घटकापर्यंतच्या अडचणी सोडवण्यात त्यांची
हातोटी असल्याने त्यांना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानणारा वर्ग आहे.

अशातच काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी मिळाली असून सुरवातीच्या काही
नाराजी नाट्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष एकदिलाने काम करत आहेत.
1978 पासून भाजपने अपवाद वगळता सातत्याने येथून विजय मिळवला असला तरी अगोदर भाजप शिवसेना युती आणि
यानंतर विरोधी मतांमधील फूट हीच भाजपच्या पथ्यावर पडत गेल्याचे पाहायला मिळते.
त्यामुळे अनेक वर्षे मत वाया गेल्याची रुखरुख लागलेला मतदार वर्ग हा यंदा ‘विजयी’ मत देणार असा विश्वास महाविकास आघडीला आहे.
त्यामुळेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील पूर्ण ताकद धंगेकर यांच्या पाठीशी लावल्याचे चित्र सध्याच्या टप्प्यात पाहायला मिळत आहे.

 

Web Title : – Pune Kasba Peth Bypoll Election | Kasba by-election: ‘Strength of power’ behind Hemant Rasane, ‘Blessing’ of people to Ravindra Dhangekar?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | बलात्कारातून झालेल्या मुलाच्या संगोपनासाठी दिलेले चेक झाले बाऊन्स; 65 वर्षीय माजी मंत्र्यासह चौघांविरूध्द गुन्हा

Madhuri Pawar | रानबाजारनंतर माधुरी दिसणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात; साकारणार भावूक करणारी भूमिका

Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना