Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुक : ब्राह्मण समाज नाराज आहे की नाही हे 2 तारखेला समजेल, कुणाल टिळक प्रचारात सहभागी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. कसब्यातून आज महायुतीचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचाराचा शुभारंभ वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी टिळक कुटुंब प्रचारात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ब्राह्मण समाज (Brahmin Community) नाराज आहे का? हे दोन तारखेला समजेल असे कुणाल टिळक (Kunal Tilak) यांनी सांगितले. कसब्याच्या (Pune Kasba Peth Bypoll Election) उमेदवारीवरून ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत कुणाल टिळक यांना विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले.

कुणाल टिळक म्हणाले, आम्हाला उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या सोशल मीडियावर आणि सगळीकडे चर्चा रंगल्या आहेत. मात्र, ब्राह्मण समाज नाराज आहे की नाही हे येत्या 2 मार्चला कसब्याच्या निकालाच्या दिवशी सर्वांसमोर येईल. परंतु आम्ही नाराज नाही, असेही स्पष्टिकरण कुणाल टिळक यांनी दिले.

2 मार्चला पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईल त्यावेळी भाजपचा (BJP) उमेदवार विक्रमी मतांनी निवडून आल्यावर कोण किती नाराज आहे हे स्पष्ट होणार आहे. प्रचाराची सुरुवात झाली आहे. त्यात मोठ्या संख्येने भाजपचे नेते आणि कर्यकर्ते सहभागी झाले आहे. मी देखील या प्रचारात सहभागी झालो आहे. या निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास कुणाल टिळक यांनी व्यक्त केला.

गुरुवारी सकाळी ओंकारेश्वर मंदिरापासून रॅली काढण्यात आली होती. यामध्ये शहराध्यक्ष जगदीश मुळीक
(City President Jagdish Mulik), प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol),
आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), शैलेंद्र चव्हाण (Shailendra Chavan),
नाना भानगिरे (Nana Bhangire), माजी आमदार बापुसाहेब पठारे (former MLA Bapusaheb Pathare),
योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), माजी सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar),
प्रभारी धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title :-Pune Kasba Peth Bypoll Election | kunal tilak participated in the campaign of hemant rasane after bjp agitation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपाच्या प्रचाराचे लोण शोळेपर्यंत ! पालकांकडून संताप व्यक्त

Amruta Khanvilkar | केवळ चार शब्दातच अभिनेत्री अमृता खानविलकरने केले ट्रॉलर्सचे तोंड बंद; व्हिडिओ व्हायरल

Saumya Tandon | ‘भाभीजी घरपर है’ फेम अभिनेत्री सौम्या टंडनने केला एक धक्कादायक खुलासा; म्हणाली…