Pune Kasba Peth Bypoll Election | ‘… म्हणून गिरीश बापट निवडणुक प्रचाराच्या रिंगणात उतरले’, देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपने (BJP) आजपर्यंत वापरा आणि फेकून द्या असे धोरण राबवले आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Late MLA Mukta Tilak) यांच्या कुटुंबाचा वापर करुन घेतला मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही. तर गंभीर आजारी असलेल्या गिरीश बापटांना (Girish Bapat) कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरवले, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर देताना गिरीश बापट प्रचारात का उतरवले (Pune Kasba Peth Bypoll Election) याचे कारण सांगितले.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही गिरीश बापट या व्यक्तीली ओळखलेलच नाही. बापट हे भाजपचे असे नेते आहेत, ज्यांनी तळापासून वर पर्यंत भाजप तयार केली आहे. भाजपसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन दिलेलं आहे. आणि त्यांच्याच मतदारसंघात जर निवडणूक होत असेल ते घरी कसे बसू शकतात? एका वृत्तवाहीनीने फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. (Pune Kasba Peth Bypoll Election)

फडणवीस पुढे म्हणाले, बापट का आले आम्ही सांगतो, आम्ही त्यांना या म्हटलो नाही. मी त्यांना भेटण्यासाठी गेले होतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. ते मला म्हणाले की, हे काय सुरु आहे, हे सगळे विरोधक अस पसरवत आहेत की मी आपल्या उमेदवाराच्या विरोधात आहे. मी प्रचारात येणार नाही. असं विरोधक अफवा पसरवत आहेत आणि ते मला खपणारं नाही. त्यामुळे मी याबाबत सभा घेणार आहे, मी त्यांना सांगितले. तुम्ही सभा घेऊ नका. तुम्ही एक पत्रक काढा, पण या विरोधकांच्या वक्तव्यांमुळे ते इतके व्यथित होते, की मी गेल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी त्यांनी सांगितलं की आज मी सभा करणार आहे आणि ते गेले व बोलले, असं फडणवीसांनी सांगितलं.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | ‘… That’s why Girish Bapat entered the election campaign arena’, Devendra Fadnavis’ reply to Uddhav Thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | बुधवारी डेक्कन, कोथरुड भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Crime News | जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जणांवर कारवाई

Vh1 Supersonic | भारताचा स्वतःचा बहु-शैली संगीत आणि जीवनशैली महोत्सव, व्हीएच1सुपरसॉनिक, पुण्यात