Pune Kidney Smuggling Case | 15 लाखांचे अमिष दाखवून महिलेची घेतली किडनी, पुण्यात किडनी तस्करीचा प्रकार उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kidney Smuggling Case | अनेक वेळा किडनी तस्करीसाठी अपहरण (Kidnapping), हत्या (Murder In Pune) झाल्याचंही समोर आलं आहे. महाराष्ट्रातही किडनी तस्करीची अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत (Pune Crime). त्यातच आता पुण्यातही अशी किडनी तस्करी (Pune Kidney Smuggling Case) आणि फसवणूकीची (Cheating) घटना समोर आली आहे. पुण्यात किडनी ट्रासंप्लांटसाठी (Kidney Transplant) किडनी काढून घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

 

एका महिलेने फसवणूक करुन किडनी काढल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात (Koregaon Police Station) तक्रार दाखल केली आहे.
महिलेने तक्रारीत म्हटले की, 15 लाख रुपयांचे आमिष (Lure of Rs 15 Lakh) दाखवून किडनी काढून घेतली मात्र पैसेच दिले नाहीत,
असा आरोप किडनी दान केलेल्या एका महिलेने दलालाविरोधात केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेची शस्त्रक्रिया झाल्याचंही उघडकीस आली आहे.

15 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून किडनी काढून (Pune Kidney Smuggling Case) घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे.
24 मार्च रोजी पुण्यातील रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली.
किडनी दान करणाऱ्या या महिलेने 29 मार्च रोजी तिचं रुग्णालयात नोंदवलेलं नाव खरं नसल्याचं सांगितले.
या महिलेकडून यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
महिलेने रुग्णालयावर आक्षेप घेतल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे अर्ज करुन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Kidney Smuggling Case | kidney smuggling racket exposed in pune fraud with a woman by showing a lure of rs 15 lakh koregaon police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा