Pune Lok Sabha Bypoll Election | लोकसभा पोटनिवडणुकीवरुन पुण्याचं राजकारण तापलं! प्रशांत जगतापांच लागलं बॅनर, तर शरद पवारांच्या मर्जीतल्या नेत्यानंही ठोकला शड्डू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lok Sabha Bypoll Election | भाजपचे खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसह (BJP) सर्वच प्रमुख पक्षातील नेत्यांनी लॉबिंगला सुरुवात केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे बापटांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. त्यानंतर या जागेसाठी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) रस्सीखेच सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी आपण स्वत: पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll Election) लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे स्पष्ट केलं आहे. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष कार्य़ालयाबाहेर भावी खासदार म्हणून बॅनरबाजी करण्यात आली होती.

 

प्रशांत जगताप यांनी आपण ही पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll Election) लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे बडे नेते आणि शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी देखील या जागेवर दावा केला आहे. सध्या पुण्यात आपल्या एवढा जनतेत मिसळणारा दुसरा नेता कोणीच नसल्याने ही पोटनिवडणूक आपण लढवणारच असल्याचं दीपक मानकर यांनी सांगितले. ते एका वृत्तपत्राच्या वेबसाईटशी बोलत होते.

 

दीपक मानकर म्हणाले, गेली 35 वर्ष पुण्याच्या जनेतेसाठी काम केले असून आता कार्यकर्त्यांनीच आग्रह धरला आहे की मी लोकसभा निवडणूक लढवावी. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण पोटनिवडणूक लढवणार आहे. आपल्याला मतदारसंघाची पूर्ण माहिती आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात (Assembly Constituency) माझ्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. मला असं वाटतं की माझ्या एवढा वेळ जनतेला कोणताच उमेदवार देऊ शकत नाही. गेल्या 35 वर्षात लाखो लोकांसोबत एक वेगळं नातं मी जोडलेले आहे, असं मानकर यांनी सांगितलं.

मानकर पुढे म्हणाले, अनेक युवकांचे प्रश्न मी माझ्या कारकिर्दीत सोडवले आहेत. केवळ निवडणुकीपुरते काम करण्याचा स्वभाव नाही तर काय लोकांसाठी झगडत राहण्याची माझी सवय आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांची भावना जपण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. कसबा पोटनिवडणुकीतील (Kasba by-Election) वातावरण आजही तसेच आहे आणि त्यामुळे मी ही पोटनिवडणूक लढवावी अशी लोकभावना असेल तर जागा काँग्रेसची असली तरी राष्ट्रवादी देखील या जागेची मागणी करु शकते.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह दीपक मानकर यांनी या जागेवर दावा केल आहे.
विशेष म्हणजे मानकर हे शरद पवार यांच्या मर्जीतले नेते मानले जातात. राष्ट्रवादीमध्ये लोकसभेच्या या जागेसाठी मोठी चूरस पहायला मिळत आहे.
त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

दीपक मानकर यांचा परिचय
दीपक मानकर यांनी 1988 पासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ते 10 वर्षे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.
2007 मध्ये पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation) निवडणूक लढवून नगरसेवक झाले.
पहिल्या वेळेस स्वीकृत नगरसेवक पदासह 4 टर्म नगरसेवक राहिले. त्यांनी उपमहापौर (Deputy Mayor) पद भूषवले आहे.
याशिवाय 10 वर्ष शिक्षण मंडळावर काम केलं. 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला.
काँग्रेसमध्ये असले तरी ते शरद पवार यांच्या मर्जीतील नेते म्हणून ओळख होती.
त्यांचा पुण्यात दांडगा जनसंपर्क असून युवक, गणेश मंडळ यांच्या प्रश्नावर पुढे येऊन लढणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.
तसेच राष्ट्रवादीमधील लोकांमधील नेता म्हणून ते लोकांमध्ये परिचित आहेत.

 

Web Title :- Pune Lok Sabha Bypoll Election | ncp leader deepak Mankar said he will contest pune lok sabha by poll after prashant jagtap posted banners

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nashik ACB Trap | नाशिक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍याविरूध्द लाच प्रकरणी गुन्हा

Ajit Pawar | तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार-आमदारांना अपात्र करा, अजित पवारांची केंद्राकडे मागणी

Pune News | पुणे : कृषि विभागामार्फत ‘जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची’ अभियान राबविण्यात येणार