Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक 2024 : मुरलीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर कोण टफ फाईट देणार? वसंत मोरेंचे ‘तात्या स्टाईल’ उत्तर (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lok Sabha Election 2024 | पुण्यातील मनसेचे (MNS) माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी विविध पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, त्यांना कोणाकडूनच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi (VBA) पुणे लोकसभेसाठी वसंत मोरेंना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पुण्यात तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे.

भाजपचे (BJP) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि आता वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तिघेही तगडे उमेदवार असून ही लढत काहीशी अटीतटीची होण्याची शक्यता आहे. पंरतु मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर या दोन्ही उमेदवारांपैकी वसंत मोरे यांना कोणता उमेदवार टफ फाईट देणार? कोणत्या उमेदवाराकडून मोरेंना धोका आहे? याबाबत वसंत मोरे यांना विचारले असता त्यांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिले. 4 जूनला सगळी उत्तरं मिळतील, असे वसंत मोरे म्हणाले. (Pune Lok Sabha Election 2024)

टीकाकारांना 4 जूनला उत्तर मिळेल

वसंत मोरे म्हणाले, भाजपचे उमेदवार असतील किंवा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर असेल. दोघांशी माझे सभागृहामध्ये अतिशय चांगले संबंध आहेत. ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मी यशस्वी करेल. ज्यांना टीका करायची ते टीका करत राहतील आणि टीका करणाऱ्यांना मला जे उत्तर द्यायचं असेल ते चार जूनला मिळेल, असे सांगत वसंत तात्यांनी दोन्ही उमेदवारांना थेट आव्हान दिले आहे.

‘या’ मुद्द्यावर निवडणूक लढवणार

वसंत मोरे पुढे म्हणाले, मी विकासाच्या मार्गावर चालणारा कार्यकर्ता आहे. मी मनसे मध्ये जरी होतो तरी तेव्हा सुद्धा मी या उपनगराचा विकास केलेला आहे हे पुणेकरांनीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. माझा कात्रजच्या विकासाचा पॅटर्न होता आणि तोच पुणे शहरामध्ये चालू राहील आणि मी विकासाच्या मार्गावर चालणारा कार्यकर्ता आहे. पुण्याचा सर्वांगीण विकास हा माझा प्रचाराचा पहिला मुद्दा असेल. पहिल्यांदा पुण्यामध्ये जर विकासाच कुठलं काम करायचं असेल तर मी ते वाहतूक या विषावरती करेल.

संघर्षातून यशस्वी होईल

विकासासंदर्भात वसंत मोरे म्हणाले, चार वर्ष पूर्ण कालावधीपासून पुणेकरांच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला विकासकाम काही नवीन नाही. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आतापर्यंत संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही त्यामुळे मला वाटते की संघर्ष करत राहायला पाहिजे आणि मी तो करत राहील आणि या संघर्षातून मी यशस्वी होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक