आधी लग्न लोकशाहीचं म्हणत वधूने केलं मतदान

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातिल महत्वाचा क्षण असतो परंतु राष्ट्रीय कर्तव्य सुद्धा महत्वाचे असते असा संदेश एका तरुणीने दिला आहे. लग्न विधीपूर्वी एका तरुणीने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. पुण्यातील श्रद्धा भगत यांनी त्यांच्या लग्नापूर्वी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

श्रद्धा भगतचा अमित सातपुते यांच्याशी २३ एप्रिल रोजी मंगळवारी संध्याकाळी विवाह होणार आहे. तरीही लग्नापूर्वी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावून श्रद्धा विवाह स्थळी रवाना झाली.

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील चौदा जागांसाठी मतदान होत आहे. पुण्यात सकाळपासूनच शहरातील विविध मतदान केंद्रावर नागरिक जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. श्रद्धा भगत हि विवाह बंधनात अडकणार आहे. तरीही त्याआधी मतदान केंद्रावर नऊवार साडी, हिरवा चुडा, डोक्याला बाशिंग बांधून नवरीच्या वेशात आपला मतदानाचा हक्क बजावला. श्रद्धाचे बी.एससी शिक्षण झाले आहे.

श्रद्धाने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते प्रत्येकाने बजावलेच पाहिजे. आज माझ्या आयुष्यातील कितीही महत्वाचा दिवस असला तरीही राष्ट्रीय कर्तव्यास प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे मी माझ्या लग्नापूर्वी मतदान करण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या आई वडिलांनी व माझ्या परिवाराने साथ दिली आणि त्यानुसार मी नियोजन करून माझा मतदानाचा हक्क बजावला. मी सर्वाना एकाच सांगते की आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. काही झाले तरी मतदान करायला विसरू नका. असे श्रद्धा म्हणाली.