Pune Lok Sabha | महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरलीधर मोहोळांच्या प्रचारात ताकदीने उतरणार

पुणे : Pune Lok Sabha | मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांना सर्वत्र मनसेच्या मतांचा लाभ होणार आहे. पुण्यात देखील मनसेने महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारात ताकदीने उतरणार असल्याचा शब्द दिला आहे.

आता शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात मनसेकडून प्रचार केला जाणार आहे. महायुतीच्या प्रचारात कशा पद्धतीने सहभागी व्हायचे, यादृष्टीने मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यानिमित्ताने मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. (Pune Lok Sabha)

त्यावेळी महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मनसे पूर्ण ताकदीने प्रचारात सक्रिय होईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस अजय शिंदे, रणजित शिरोळे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेवक हेमंत रासने यावेळी उपस्थित होते.

या भेटीनंतर मोहोळ आणि मनसेचे सरचिटणीस वागसकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी वागसकर यांनी म्हटले की, शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात मनसे कार्यकर्ते
आणि पदाधिकारी सक्रिय होतील. मात्र, त्यांचा यथोचित सन्मान राखला जावा.
दरम्यान, मनसेची ही अपेक्षा भाजपाने ताबडतोब मान्य केली.

अमित ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले होते
की, मनसे प्रचारात सक्रिय होणार असल्याने महायुतीची ताकद वाढणार आहे.
राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे.
सर्वच पक्ष एकदिलाने काम करून मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त करतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात