Pune Lonavala Crime News | चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार, संशयित नराधमाची आत्महत्या

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lonavala Crime News | नऊ वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार (Pune Minor Girl Rape Case) केल्याची घटना उघडकीस आल्याने मावळ तालुक्यात खळबळ उडाली होती. ही घटना 25 सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणातील संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी (दि.29) उघडकीस आले आहे. विजय शशिकांत मालपोटे असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. (Pune Lonavala Crime News)

याबाबत पीडीत मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय मालपोटे याच्या विरोधात आयपीसी 376, 323, 506, पॉक्सो कायदा कलम 4, 8, 12 नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. (Pune Lonavala Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत नऊ वर्षाच्या मुलीच्या आईने 27 सप्टेंबर रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे आरोपी विजय मालपोटे याच्या विरोधात फिर्याद दिली. आरोपीने पीडीत मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु करण्यात आला होता.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी परंदवाडी येथे संशयित आरोपी विजय मालपोटे हा टॉवेलच्या सहाय्याने गळफास
घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात (Shirgaon Police Station) नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा

Pune PMC News | पीएमसी इंजीनियर असोसिएशनच्या वतीने ‘अभियंता दिन सायकल रॅली 2023’ चे आयोजन