पुणे : महावितरण कंपनीचा कनिष्ठ कार्यालयीन साहयक एसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये नवीन वीज मीटर व बीज कनेक्शन संबंधीत ग्राहकांच्या नावावर करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली. ही लाच स्विकारताना महावितरण कंपनीचा कनिष्ठ कार्यालयीन साहयकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडेले. ही कारवाई आज (शुक्रवार) महावितरण कार्यालय ताथवडे शाखेसमोर करण्यात आली.

गजानन सुरेश यादव (वय-३९) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर कनिष्ठ कार्यालयीन साहयकाचे नाव आहे. या प्रकरणी एका बंधकाम व्यवसायिकाने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती.
[amazon_link asins=’B072SQKMHR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b0751aa-91b6-11e8-9826-e93e5a1fcb93′]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी नव्याने बांधलेल्या इमारतींमधील नवीन वीज मीटर व बीज कनेक्शन संबंधीत ग्राहकांच्या नावावर करण्यासाठी ताथवडे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे अर्ज केला होता. नवीन मीटर व कनेक्शन ग्राहकांच्या नावावर करुन देण्यासाठी गजानन यादव याने १० हजार ४०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीमध्ये १० हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताथवडे येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर सापळा रचला. आरोपी यादव याने तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. गजानन यादव याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.