दुर्दैवी ! मुलाच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या वडिलांचा लोकलमधून पडून मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुलाच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या पित्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कुर्ला स्टेशनजवळ बुधवारी रात्री ही घटना घडली. तानाजी लवांगरे (वय-५९) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून ते पुण्याहून मुंबईला मुलाच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १०.५५ च्या सुमारास कुर्ला स्टेशनवर तानाजी लवांगरे जखमी अवस्थेत रुळावर पडलेले होते. याबाबत स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी चौकशी केली असता लवांगरे यांच्या बॅगेमध्ये लग्नाच्या निमंत्रण पत्रिकांचा गठ्ठा आढळला. त्यावरून शोध घेतला असता त्यांच्या मुलाचे सुमितचे २३ जूनला लग्न असून ते नातेवाईक आणि मित्र परिवाराला निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी मुंबईला गेले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. लवांगरे यांची मुलगी ऐरोलीला राहते तिला निमंत्रण पत्रिका दिल्यानंतर दुसऱ्या नातेवाईकांकडे पत्रिका देण्यासाठी जात असताना ही घटना घडली.

Loading...
You might also like