पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro Timetabel In Ganeshotsav 2023 | शहरामध्ये सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी चालू असून संपूर्ण पुणे शहर गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. पुणे पालिका, पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि पीएमपीएमएल देखील गणेशोत्सव दरम्यान नागरिकांच्या सेवेसाठी ‘रेडी’ आहेत. मग यामध्ये पहिल्यांदा गणेशोत्सवामध्ये सहभागी होणारी पुणे मेट्रो देखील कशी मागे राहील. पुणे मेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांच्या आनंदमय प्रवासासाठी गणेशोत्सवानिमित्त खास वाढीव प्रवासी सेवा देण्याचे जाहीर केले आहे. सोशल मीडियावर ऑफिशियल अकाऊंटवर पोस्ट शेअर करत पुणे मेट्रोने ही आनंद वार्ता पुणेकरांसोबत शेअर केली आहे. (Pune Metro Timetabel In Ganeshotsav 2023)
पुणे आणि गणेशोत्सव हे जणू एक समीकरणच बनले आहे. अनेकजण शहरातील उत्सव व देखावे पाहण्यासाठी रात्री उशीरापर्यंत मध्यवर्ती भागामध्ये येत असतात. हीच बाब लक्षात घेत पुणे मेट्रोने दोन्ही मार्गावरील प्रवासी सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 22 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2023 पर्यंत मेट्रो ही सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तसेच शहरातील विसर्जन मिरवणूक देखील प्रमुख आकर्षण असते. यामुळे 28 सप्टेंबरला अनंत चतुर्थीच्या दिवशी फक्त एक दिवसासाठी मेट्रो सेवा ही सकाळी 6 वाजल्यापासून ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. फक्त एका दिवसासाठी ही रात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो प्रशासनाकडून सेवा दिली जाणार आहे. नागरिकांच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी ही खास सुविधा पुणे मेट्रोकडून दिली जाणार आहे. (Pune Metro Timetabel In Ganeshotsav 2023)
पुणे मेट्रोचा हा शहरातील पहिलाच गणेशोत्सव आहे. त्यामुळे नागरिकांसाठी खास सुविधा देण्यात आली असून सोबतच काही नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना गणपतीची मूर्ती ही मेट्रोमधून घेऊन जाता येणार आहे मात्र काही नियम देखील पाळावे लागणार आहे. मेट्रोमधून गणराय घेऊन जाताना खालील काळजी घ्यावी:
- गणपतीची मूर्ती 2 फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीची असावी.
- मूर्तीला सुरक्षित व व्यवस्थित झाकून न्या.
- कमी गर्दीच्या वेळेस मूर्ती नेण्यास प्राधान्य द्या.
- स्थानकावरील लिफ्टचा वापर करा.
- मेट्रो ट्रेन आणि फलाट यांच्यामधील अंतर लक्षात घ्या आणि पिवळ्या रेषेच्या मागे उभे रहा.
- ढोल-ताशे, भोंगे वाजविण्यासाठी असलेले निर्बंधाचे पालन करा, शांतता राखा.
- आपल्यापासून इतर प्रवाशांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या.
- स्थानक, फलाट, मेट्रो ट्रॅक व परिसर अस्वच्छ करु नका.
- एकमेकांना साहाय्य करा व सुरक्षित प्रवास करा.
- जाण्या-येणाच्या मार्गात अडथळा येणार नाही याची काळजी घ्या.
https://x.com/metrorailpune/status/1703738018996339135?s=20
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sharad Pawar Public Meeting In Pune | अजित पवारांच्या पुण्यातील रोड-शो नंतर शरद पवारांची जाहीर सभा
Ujjwal Nikam Reaction On Maharashtra Political Crisis | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाळ कोणाचे?
उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान
Pune BJP | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर ! 18 उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस आणि 18 चिटणीस