पुण्यात मेव्हण्याचा साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पूर्ववैमनस्यातून मेव्हण्याचा साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली. दरम्यान गेल्या काही दिवसापासून सुरू झालेले खुनाचे सत्र सुरूच आहे.

अक्षय सुरेश गांगोडेकर (वय 24) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर दाजी इंद्रजित गुलाब गायकवाड (वय 22) याच्यासह साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा आरोपी इंद्रजित याचा मेव्हणा आहे. त्यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद आहेत. दरम्यान अक्षय याच्यावर 2016 मध्ये एक गुन्हा दाखल आहे. पूर्वी झालेल्या भाडनाचा राग आरोपींच्या मनात होता. यावरून हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान रात्री येथील भैरवनगर येथील धनेश्वर मैदानात आरोपींनी अक्षयला गाठून मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात दगडाने जबर मारहाण करत त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like