Pune : पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महापालिकेच्या कंत्राटदाराची आत्महत्या, हडपसर पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पालिकेचे कंत्राट घेऊन भागीदारीत काम करणाऱ्या एका कंत्राट दाराने त्याच्याच पार्टनरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 30 सप्टेंबरला ही घटना घडली आहे.

शंकर बसवराज हुगार (वय 48) असे आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मी हुगार (वय 40) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शांतप्पा हुगार (वय 30) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर हुगार आणि शांतप्पा हुगार हे दोघे साडू आहेत. दरम्यान ते दोघे पार्टनरशिपमध्ये कंत्राट घेऊन कामे करत होते. त्यांनी जेन कंपनीचे वॉटर पाईपलाईन टाकण्याचे काम घेतले होते. यासोबतच महापालिकेचे ड्रेनेज टाकण्याचे देखील काम केले होते. कामातून जो काही नफा होइल तो दोघांनी घ्यायचा असा त्यांचा व्यवहार होता.

पण आरोपी याने 14 लाख रुपये नफा झाल्यानंतर तो शंकर हुगार यांना न सांगता व पैसे न देता त्यांची फसवणूक केली. त्यांनी पैसे परत मागितले तरी ते न देता शिवीगाळ व मारहाण केली. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून शंकर हुगार यांनी गळफास लावून आत्महत्या केली. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्याप आरोपीला पकलेले गेले नसून पोलीस तपास करत आहेत.