Pune Municipal Corporation (PMC) | धानोरीतील घटनेनंतर पुणे महापालिका अतिक्रमण विभागाने घेतला मोठा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर पालिकेकडून Pune Municipal Corporation (PMC) शहरात अतिक्रमण कारवाई (PMC Encroachments Action) सुरु आहे. या कारवाई दरम्यान काल (मंगळवार) धानोरी येथे अतिक्रमण पथकावर जमावाने हल्ला (Mob Attack) चढवत अधिकारी आणि कर्मचाऱ्याला बेदम मारहाण (Beating) केल्याचा प्रकार घडला. या हल्ल्यात अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. काल घडलेली घटना ही अतिशय निंदनीय असून, अशा प्रकारचे हल्ले खपवून घेणार नाही असा इशारा पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप (PMC Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिला आहे.

 

धानोरी (Dhanori) येथे घटलेली घटना अतिशय निंदनीय असून, आगामी काळात महापालिका Pune Municipal Corporation (PMC) अतिक्रमण विभागाच्या वतीने सुरक्षेबाबत जास्तीत जास्त उपाययोजना केल्या जातील.
अतिक्रमण विभाग हल्ले खपवून घेणार नाही. निर्मूलनाची मोहीम सातत्याने सुरु राहणार असल्याची माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

 

मंगळवारी (दि.29) दुपारी महापालिकेचा आकाशचिन्ह बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने परिमंडळ च्या विभागात संयुक्त मोहीम सुरु होती.
यावेळी स्थानिक नागरिकांनी व काही व्यावसायिकांनी कारवाईसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दगडफेक करुन मारहाण केली.
याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) 25 ते 30 जणांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

धानोरी प्रकरणाची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
आगामी काळात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी अतिक्रमण विभाग सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करणार आहे.
तसेच कारवाईदरम्यान प्रमुख अधिकारी तसेच कर्मचारी यांना देखील चोख बंदोबस्त देण्यात येणार आहे.
नियमांचे उल्लंघन (Violation of Rules) करणाऱ्या नागरिकांकडून अतिक्रमण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक साधनांचा देखील आगामी काळात वापर केला जाईल असेही माधव जगताप यांनी सांगितले.

 

आगामी काळात कठोर कारवाई
धानोरी येथील घटनेनंतर आज (बुधवार) येरवडा विभागात (Yerwada Division) अतिक्रमण कारवाई करण्यात येत असून यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असताना कारवाईदरम्यान असे हल्ले होणे निंदनीय आहे.
मुळातच नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करु नये.
नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिक तसेच नागरिकांवर आगामी काळात कडक कारवाई केली जाणार असल्याचे जगताप यांनी यावेळी नमूद केले.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | After the incident in Dhanori Pune Municipal Corporation (PMC) Encroachment Department took a big decision

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा