Pune Municipal Corporation (PMC) | विरोधकांवर महापालिकेच्या जागा बळकवल्याचा आरोप करणार्‍या सत्ताधार्‍यांनीच स्वपक्षाच्या नगरसेवकांवर केली जागांची खैरात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | अ‍ॅमिनीटी स्पेसच्या (Pune Amenity Space) जागा भाडेतत्वाने खाजगी संस्थाच्या घशात घालण्याला विरोधी पक्षांनी विरोध केल्यानंतर विरोधकांच्या संस्थांच्या ताब्यात असलेल्या जागांची यादीच जाहीर करणार्‍या सत्ताधारी भाजपने (BJP) शेवटच्या टप्प्यात स्वपक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थांसाठी जागांची खैरात केली. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत (PMC GB Meeting) जागा वाटपाचे तब्बल २८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून सर्वाधिक प्रस्ताव हे भाजपच्या नगरसेवकांचेच आहे. Pune Municipal Corporation (PMC)

 

कोथरूड (Kothrud) येथील मयूर आयडियल डीपी रस्त्यावरील (DP Road, Pune) क्रीडांगण, कोंढवा येथील विरंगुळा केंद्र, व्यायामशाळा, बहुद्देशीय हॉल, पर्वती येथील भारतमाता अभ्यासिकेमधील प्रत्येक मजला कुठल्या न कुठल्या संस्थेला देण्यात आला आहे. महापालिका शाळेच्या तळमजल्यावरील जिन्याखालील खोलीही समाजपयोगी कामासाठी मिळवण्यात नगरसेवक सर्वसाधारण सभेत यशस्वी ठरले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी या प्रस्तावांना विरोध केला असला तरी त्यांच्याच पक्षाच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी या प्रस्तावांना अनुमोदन दिल्याने या प्रस्तावांना सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे चित्र गुरूवारच्या ऑनलाईन सभेत उमटले. Pune Municipal Corporation (PMC)

 

ऍमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे आल्यानंतर विरोधी पक्षांच्या आजी-माजी नगरसेवकांच्या ताब्यातील मिळकतींची माहिती सार्वजनिक करण्याची तंबी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी दिली होती. त्यानंतर करार संपलेल्या मिळकती ताब्यात घेण्यासाठी स्थायी समितीत ठराव करण्यात आले. त्यातील एक मिळकत ताब्यात घेण्यासाठी सर्वसाधारण सभेत मध्यरात्रीपर्यंत चर्चा झडली होती. महापालिकेच्या मिळकतींचा व्यावसायिक वापर केल्यास त्याद्वारे महापालिकेस उत्पन्न मिळते. समाजोपयोगी कामांसाठी या मिळकतींचा वापर करण्याच्या उद्देशाने यापूर्वी दिलेल्या मिळकतींचा सुरू असलेला वापर हा सध्या वादाचा मुद्दा आहे. त्यामुळे यापुढील काळात तरी महापालिकेच्या मिळकतींचा वापर नाममात्र दरापेक्षा व्यावसायिक दराने होणे अधिक गरजेचे आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापालिकेचे हित जपून निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र, सर्वपक्षीय नेत्यांनी यालाही तिलांजली दिली आहे.

महापालिका प्रशासन काय करणार?
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नाममात्र दराने दीर्घमुदतीसाठी महापालिकेच्या अनेक मालमत्तांचे मुक्तहस्ताने वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी महापालिका प्रशासनाकडून या प्रस्तावांची अंमलबजावणी होण्यास अडचण आहे. महापालिकेच्या जागा वाटप नियमावलीनुसार संयुक्त प्रकल्प असला तरी कुठलिही जागा, मालमत्ता भाडेतत्वावर द्यायची असल्यास निविदा काढणे क्रमप्राप्त आहे. या निविदा काढल्यानंतरच या जागांचे वाटप करणे शक्य होणार आहे.

 

कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठीच प्रस्तावांना मंजुरी!
महापालिकेची मुदत अवघी २४ दिवस राहीली आहे. लकवरच निवडणुका जाहीर होतील.
या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या जागांवर विविध संस्थांसोबत संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रम राबविण्याच्या नावाखाली कार्यकर्त्यांच्याच संस्थांना
या जागा देण्याचे प्रस्ताव आहेत. सामाजिक उपक्रमासाठी देण्यात आलेल्या जागांचा उपयोग नेमका कशासाठी केला
जातो याचे ऑडीट महापालिकेकडून केले जात नाही. त्यामुळे अनेकदा मेन्टेनन्सच्या नावाखाली स्थानीक नागरिकांकडून कार्यक्रमांसाठी
या जागेचा मोबदला या संस्थांकडून घेतला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात. त्यामुळे सर्वसाधारण सभेने प्रस्ताव मंजुर केले
असले तरी २००८ च्या जागा वाटप नियमावलीनुसारच संस्थांना जागा देण्याचा अंतिम निर्णय प्रशासन घेणार आहे.
तूर्तास तरी सर्वसाधारण सभेत आमच्यापरीने निर्णय घेउन कार्यकर्त्यांना खूश करण्याचा प्रयत्न राजकिय पक्षांनी केल्याचे पाहायला मिळत आहे.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uday Samant On Narayan Rane | ‘टीका करून गाजावाजा करत फिरणारे, कोकणात निवडणुकीत पडतात’

 

Pune Crime | पुणे गुन्हे शाखेकडून कात्रज परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा, 10 जण ताब्यात

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 302 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी