Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात; ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident |बंगलुरु – मुंबई महामार्गावरील नवले पुलाजवळील तीव्र उतारावर आज सकाळी पुन्हा एकदा विचित्र अपघात झाला असून त्यात ८ वाहनांचे नुकसान झाले आहे. Pune Navale Bridge Accident | accident of truck on navale bridge

ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे जाणार्‍या ८ वाहनांना धडक दिली. शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

सातार्‍याकडून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या ट्रक आज सकाळी नवले पुल आणि हॉटेल विश्वाससमोर आला होता. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे जाणार्‍या ४ चारचाकी व ३ रिक्षांना जोरात धडक दिली. त्यातील काही जण जखमी झाले आहेत. या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलीस ही वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Pune Navale Bridge Accident | accident of truck on navale bridge