Pune News | अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पुण्याला 16 कोटींचा निधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | सन 2021 च्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील बाधितांना द्यावयाच्या नुकसान भरपाईसाठी १६ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील १०० महसूल मंडळापैकी ४२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. (Pune News)

 

जिल्ह्यात २ डिसेंबर २०२१ रोजी दहा तालुक्यांतील ४२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती. पाऊस आणि थंडीमुळे हायपोथर्मिया आणि उपासमार यामुळे जनावरे दगावली. त्यात पशुधनामध्ये मोठ्याप्रमाणात दुधाळ मोठी व लहान जनावरांचा समावेश होता. तसेच मृत मेंढ्याच्या मालकांना आर्थिक मदत केली जाणार आहे. हिवाळ्यातील थंडीसह अवकाळी पाऊस व वातावरणामुळे शेतीपिक व फळपिकांचे नुकसान झाले होते. (Pune News)

 

महसूल प्रशासनाने पंचनामे करुन राज्य शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यात अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना ८४ लाख २० हजार, बारामती तालुक्यात दोन घरांची अंशतः पडझड झाली, त्यांना १२ हजार रुपये, शेतीपिक, फळपिकांच्या नुकसानीकरिता १५ कोटी ६३ लाख ५६ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी १३ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने १६ कोटी ४७ लाख ८८ हजार रुपये मंजूर केले आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी
१६ कोटी ४७ लाख ८८ हजार रुपयांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य शासनाकडे केली होती.
त्यानुसार १६ कोटी ४७ लाख ७६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
हा निधी संबंधित तालुक्यांना वर्ग करण्यात आला आहे. येत्या एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष मदत वाटपाला सुरुवात केली जाईल.

– संजय तेली, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी 

 

Web Title :- Pune News | 16 crore fund to Pune for compensation of heavy rains

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | 30 हजार रुपये लाच घेताना पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Maharashtra Rains | शनिवारपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस; नऊ जिल्ह्यांत अतिमुसळधार

 

Ajit Pawar | वेदांता प्रकल्पावरुन शिवसेना-राष्ट्रवादीची सरकारवर टीका, फडणवीस रशिया दौऱ्यावर, अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला