Pune News : खराडी आयटी पार्क परिसरातील एका भंगार गोडाऊनमधील साहित्याला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरातील खराडी आयटी पार्क येथे एका मोकळ्या जागेत असलेल्या भंगार गोडाऊनमधील साहित्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे स्वरूप तीव्र आहे. सुदैवाने मात्र यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

ए-वन आयटी पार्क फेस वन येथे मोकळी जागा आहे. ही जागा एका बांधकाम व्यवसायिकाची असल्याचे समजते. त्याठिकाणी भंगारचे गोडावून आहे. मोठ्या प्रमाणात स्क्रॅप ठेवले होते. दुपारी अचानक याठिकाणी आग लागली. काही क्षणात आगीने उग्र रूप धारण केले. नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर येरवडा अग्निशमन दलाच्या जवानांनी फायर बंब घेऊन धाव घेतली. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आग मोठ्या प्रमाणात भडकली असल्याने जवनांना अथक प्रयत्न करावे लागले. अर्धा ते पाऊण तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवनांना यश आले आहे. हे भंगार गोडाऊन कोणाचे आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्याची माहिती घेतली जात आहे.