Pune News : हडपसरमध्ये कंटेनरचा धक्का लागल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – सोलापूर रस्त्यावर हडपसरमध्ये (रवीदर्शन चौक) दुचाकीवरील व्यक्तीचा कंटेनरच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.30) दुपारी बाराच्या सुमारास घडली. कंटेनरचालकाने धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहतूक नियमन करणारे वाहतूक पोलीस यांनी तत्परता दाखवत तुकाराम गायकवाड कंटेनरचालकाला तत्परता दाखवत पकडून हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले.

लक्ष्मण चिताप्पा बाके (वय 48, रा. मूळ सोलापूर, सध्या कोरेगाव पार्क) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

हडपसर पोलिसांनी सांगितले की, बाके यांची पत्नी सोलापूरहून येणार होती. त्यासाठी ते दुचाकीवर रवीदर्शनसमोरील चौकात येत होते. कंटेनरची धक्का लागल्याने ते चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बाके यांच्या पत्नीची उद्या रविवारी (दि. 31) परीक्षा होती. त्यासाठी ती हडपसरमध्ये सोलापूरहून आली होती. तिला घेण्यासाठी ते कोरेगाव पार्क येथून सोलापूर रस्त्यावरील रवीदर्शन चौकात येत होते, त्यावेळी हा अपघात झाला.