मनसेचं मिशन 2022 : ‘मी नगरसेवक होणारच’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मिशन 2022 अंतर्गत मनसेनं मी नगरसेवक होणारच शिबीर आयोजित केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुक उमेदवार व पदाधिकार्‍यांसाठी हे शिबीर पर्वती येथील वसंतराव बागुल उद्यानातील पंडित भिमसेन सभागृहात आयोजित केलं आहे. हे शिबीर दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे.

शिबीरामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना पुणे महानगरपालिकेची कार्यपध्दती, नागरवस्ती विभागाचे कामकाज, पुणे महानगरपालिकेतील सर्व विभागांची माहिती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 97 पदाधिकार्‍यांनी शिबीराचे फॉर्म भरले आहेत. शिबीरात मार्गदर्शक म्हणून गणेश सातपुते, राजेंद्र उर्फ बाबु वागसकर, अ‍ॅड. किशोर शिंदे, रूपाली पाटील-ठोंबरे, साईनाथ बाबर, रणजीत शिरोळे, योगेश खैरे, संतोष पाटील, जयराज लांडगेंसह इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीराबाबत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी माहिती दिली आहे.

Visit : Policenama.com