Pune News | पुणे-मुंबई महामार्गावर पाषाण परिसरात अनधिकृत फर्निचर शोरुमवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai Highway) पाषाण येथे अनधिकृतपणे उभारलेल्या फर्निचर मॉल, शो-रुम इत्यादीवर बांधकाम विकास विभागाच्या (Construction Development Department) वतीने जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 1 लाख चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले. यामध्ये दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Pune News)

हे बांधकाम HEMRL (High Energy Materials Research Laboratory) या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या फर्निचर मॉल मुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण येत होता. या बाबत HEMRL कडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. पुढील आठवड्यात उर्वरित दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे. (Pune News)

यावेळी कटर मशीन, दोन जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. हिंजवडी पोलीस स्टेशनचे (Hinjewadi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

ही कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Superintending Engineer Yuvraj Deshmukh),
कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे (Executive Engineer Bipin Shinde) यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनिल कदम,
शाखा अभियंता राहुल रसाळे, समीर गडइ यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पत्नीचा राग लहान मुलीवर, जेवणात चिकन दिले नाही म्हणून मारली वीट; पाषाण परिसरातील घटना

Pune Navale Bridge Accident | वाहनाच्या धडकेत टेम्पो पलटी, तरुणाचा मृत्यू; नवले ब्रिज जवळील घटना

MLA Bacchu Kadu | भुजबळांकडून ५ कोटींचा बोभाटा; बच्चू कडूंनी सांगितलं फक्त इतक्याच मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

ACB Trap News | 45 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात