Pune News : कौतुकास्पद ! पुण्यात कचर्‍यात टाकलेल्या बाळाला वाचवण्यासाठी महिला पोलिस अधिकार्‍याची धावपळ, शेवटी ती पण एक आईच (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कात्रज घाटात रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यात अवघ्या दोन दिवसाच्या बाळाला टाकून देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यावेळी भारती विद्यापीठ येथील महिला सहाय्यक निरीक्षक मधुरा कोराने यांनी जवळ घेत त्याला नवजीवन दिले आहे. त्या बाळाला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भल्या सकाळी पोलिसांना एका बाळाला कचऱ्यात टाकून दिले असल्याची माहिती मिळाली. नागरिकांना हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी हे सांगितले. त्यानंतर रात्र गस्तीवर असलेल्या मार्शल जमदाडे आणि सहाय्यक निरीक्षक मधुरा कोराने यांनी तात्काळ घटनस्थळी धाव घेतली. त्यावेळी हे बाळ रडत होते. त्यांनी त्याला उचलून घेत मायेची ऊब दिली. त्यानंतर त्याच रडणं लागलीच थांबल, हे दृश्य पाहून पोलिसांचे देखील डोळे पाणावले. त्यानंतर त्यांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान त्याला रुग्णालयात घेऊन जातानाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर पोलिसांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान आता पोलीस बाळाला टाकून पसार झालेल्या त्या अज्ञाताचा शोध घेत आहेत.