Pune News | भाजपने राज ठाकरेंच्या नादाला लागू नये, फटका बसेल – रामदास आठवले (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | राज्यामध्ये भाजप-मनसे युतीची (bjp mns alliance) बोलणी सुरू असल्याचं आहे. दोन्ही पक्षाचे नेते देखील त्यासाठी अनुकूल आहे. मात्र केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी भाजपने राज ठाकरेंच्या नादाला लागू नये, असा सल्ला दिला आहे. पुण्यामध्ये (Pune News) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपला आरपीआय (BJP-RPI) सोबत असताना मनसेची गरज नाही.
मनसेला (MNS) सोबत घेऊन भाजपचे नुकसान होऊ शकते, राज ठाकरेंची (Raj Thackeray) आजवर उत्तर भारतीयांना विरोधाची भूमिका राहिलेली आहे.
त्यामुळे त्याचा फटका भाजपला बसू शकतो.
त्यामुळे त्यांनी राज ठाकरेंच्या नादाला लागू नये, असा सल्ला आठवले यांनी (Pune News) दिला.

 

फेब्रुवारीमध्ये राज्यातील पंधरा महापालिकांची निवडणूक होणार आहे.
यावेळी आम्हाला पुण्यामध्ये महापौर पद हवे, मुंबईमध्ये उपमहापौर करण्याची आमची मागणी आहे.
त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी बोलणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

विधानसभा लोकसभा निवडणुकीत मी ज्यावेळी उभा राहिलो त्यावेळी आमच्या पक्षाच्या चिन्हावर मी निवडून आलो.
एक वार्ड असल्यानंतर अडचण येत नाही, मात्र तीनचा प्रभाग झाल्यावर आम्हाला मते मिळत नाहीत.
महापालिकेसाठी पुण्यात 15 ते 20 जागांसाठी आमचा आग्रह आहे. मुंबईमध्ये 30 ते 35 जागा मिळायला हव्यात, अशी मागणी त्यांनी केली (Pune News) आहे.

 

Web Title : Pune News | BJP should not follow Raj Thackeray’s call, it will be a blow – Ramdas Athavale (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rakesh Jhunjhunwala | कमाईची सुर्वणसंधी ! SEBI ने 6 कंपन्यांच्या IPO ला दिली मंजूरी, जमवणार 12 हजार कोटी रुपये

Multibagger Stock | 320 रुपयांचा शेयर झाला 6200 रुपयांचा, गुंतवणुकदारांना दिला 1600% चा रिटर्न; जाणून घ्या पुढे सुद्धा राहणार का तेजी?

Satara Crime | नवरा-बायकोच्या भांडणामध्ये पतीनं स्वतःचं घर ‘फूकलं’, आजूबाजुच्या 10 घरांना लागली आग; 50 लाखाचं नुकसान (व्हिडीओ)