Pune News | ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुण्यातील चक्क 100 समाध्या चोरीला गेल्याची तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराला (Pune News) ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पुणे शहरात अनेक पुरातन वास्तू असून यांची ‘सरंक्षक स्मारक’ म्हणून नोंद आहे. त्यांचे जतन होणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचे उघडकीस आले आहे. पुणे शहरात (Pune News) चक्क ऐतिहासिक वारसा (Historical heritage) लाभलेल्या समाध्या चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. शिवाजीनगर (Shivajinagar) परिसरात इंग्रज अधिकारी (British officer) यांच्या 100 तर एका प्रख्यात शाहिराची समाधी चोरीला गेल्याची तक्रार इतिहास अभ्यासक समीर निकम (Sameer Nikam) यांनी दिली (Pune News) आहे.

समीर निकम यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner), पोलीस आयुक्त (Pune Police Commissioner), जिल्हाधिकारी (Pune Collector) व पुरातत्व विभाग (Archeology Department) यांना लेखी पत्र लिहून तक्रार केली आहे. 5 नोव्हेंबर 1817 रोजी ब्रिटिश विरुद्ध मराठे युद्धाला सुरुवात झाली. त्यावेळी ब्रिटिश गव्हर्नर (British Governor) व अधिकारी यांना ब्रिटिश रेसिडेन्सी British Residency (सध्याचे ड्रिस्ट्रिक्ट जज्ज यांचा बंगला) राहण्यासाठी दिली होता. या ठिकाणी मराठ्यांचे सरदार बापू गोखले (Bapu Gokhale) यांनी हल्ला करुन त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना मारले व तेथील संगम लॉज (Sangam Lodge) येथे त्यांना पुरण्यात आले.

Gratuity Funds | PF खात्यावर आता किती मिळेल व्याज, 1 ऑक्टोबरपासून आले नवीन रेट; जाणून घ्या

 

ब्रिटिश अधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी पुरण्यात आले होते त्या ठिकाणी त्यांच्या काळ्या पाषाणातील थडगी बांधण्यात आली होती. तसेच थोर शाहीर सगनभाऊ (Shahir Saganbhau) यांनी पेशवे (Peshwa) काळात पेशव्यांवर पोवाडे रचले. छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्यासह अनेकांवर त्यांनी पोवाडे रचून गायले देखील होते. याशिवाय जेजुरीच्या खंडोबाची सकाळची भूपाळी देखील त्यांनीच लिहिली. आजही सकाळी ती गडावर गायली जाते. त्यांची समाधी याच 100 समाधीच्या बाजूला तयार करण्यात आली होती. परंतु या समाध्या सध्या सापडत (Pune News) नाहीत.

या सर्व समाधी आणि थडगी भारत सरकारच्या राष्ट्रीय स्मारकाच्या यादीत (National Monuments List) ‘सरंक्षक स्मारक’ म्हणून नोंद आहे. या ठिकाणापासून भारतीय पुरातत्व संरक्षक पुणे उपमंडल कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. तरी देखील या समाध्या गायब झाल्याने खेद व्यक्त होत आहे. या समाध्यांचा शोध घ्यावा व ते नष्ट करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निकम यांनी केली आहे. दरम्यान, या समाध्यांच्या बाजूला खासगी बांधकाम झाले असून त्या समाध्या राडारोडा टाकून बुजविण्यात आल्याचे काही इतिहास अभ्यासकारांचे म्हणणे (Pune News) आहे.

हे देखील वाचा

Nitin Gadkari | फडणवीस यांच्याबद्दल वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावर नितीन गडकरींचा खुलासा, म्हणाले…

Pune Railway Station | दिवाळीत प्रवाशांना पुणे रेल्वे स्टेशनवर येणे पडणार ‘महागात’; रेल्वे प्रशासनाचा नवा नियम

Quickly Earn Money | 10 हजार रूपये लावून सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखापेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Dr. Amol Kolhe In PCMC | खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘एन्ट्री’नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक ‘अ‍ॅक्शन’मध्ये

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Complaint of theft of about 100 Samadhis in Pune with historical heritage; Sameer Nikam lodged a complaint with Pune Municipal Commissioner, Pune Police Commissioner, Collector and Archaeological Department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update