Pune News | कोरोनाने ऑक्सिजनचे महत्व अधोरेखित केले; मानवी आरोग्यासाठी ‘संजीवन वन उद्यानासारखे’ निसर्गनिर्मित ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरज – अजित पवार

पुणे / वारजे – Pune News | कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व सर्वांनाच पटले आहे. त्यामुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने मानवनिर्मित यांत्रिक ऑक्सिजन प्लॅन्ट पेक्षा निसर्गनिर्मित ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरज आहे. यासाठी नागरी सहभागातून वनीकरनाची नितांत गरज आहे. प्रशासनाने वनीकरनासाठी व वृक्ष संगोपनासाठी नागरिकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात (Pune News) केली.

महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांच्या पुढाकाराने वारजे डुक्कर खिंड लगतच्या वनविभागाच्या 35 एकर जागेत संजीवन वन उद्यान (Sanjeevan Forest Park) उभारण्यात येत आहे. या उपक्रमाचे भूमिपूजन अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्य मंत्री दत्ता भरणे (Datta Bharane) यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) , नगरसेवक दिलीप बराटे (Corporator Dilip Barate) , सचिन दोडके (Sachin Dodke), सायली वांजळे (Saily Wanjle), बाबुराव चांदेरे (Baburao Chandere), महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (Additional Commissioner Kunal Khemnar ) यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर सुरू असलेल्या नैसर्गिक दुर्घटनांचा उल्लेख करत अजित पवार यांनी पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित केली. यासाठी ओढे ,नाले, नद्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतील अशी कामे करू नका. येथील पशु, पक्षांच्या अधिवासाला अनुरूप देशी झाडे लावा, कोणाला झाडे लावायची असतील व ती वाढवायची असतील पण जागा नाही असे निदर्शनास आल्यास वन विभाग व महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचनाही पवार यांनी यावेळी केली.

Pune Rural Police Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल ! 33 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, 13 निरीक्षक, 9 API आणि 11 PSI चा समावेश

विदेशी झाडे काढताना टप्प्याटप्प्याने ती काढावीत व त्याठिकाणी वड, पिंपळ, आंबा यासारखी देशी झाडे लावावीत व ती वाढवावीत अशीही सूचना त्यांनी यावेळी केली. वनविभाग आणि उद्यानांच्या जागेवर कचरा होणार नाही यासाठी नागरिक आणि प्रशासनाने ही एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन पवार यांनी यावेळी केले. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापालिका व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या संजीवन वन उद्यानामागील भूमिका यावेळी विषद केली.


महाविकास आघाडी सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. राज्यात विविध ठिकाणी लोकोपयोगी
प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या कामांचा सातत्याने आढावा घेऊन त्यांना गती देणे, केंद्र
शासनाकडील प्रकल्पांसाठी पाठपुरावा करणे यासाठी दर पंधरा दिवसांनी उच्चस्तरीय बैठका सुरू
असतात असे स्पष्ट करत अजित पवार यांनी भाजपने सुरू केलेल्या ‘महाविकास आघाडीचे काम
दाखवा आणि बक्षीस मिळवा’ या मोहिमेला प्रतित्युर दिले.

हे देखील वाचा

PIB Fact Check | कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी सर्व तरूणांना 4000 रुपये देत आहे मोदी सरकार? जाणून घ्या पूर्ण ‘सत्य’

Nitin Landge Bribe Case PCMC | स्थायी समितीच्या माध्यमातून जनतेच्या पैशाचा अपहार; चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा – आम आदमी पार्टीची मागणी


ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | Corona underlined the importance of oxygen; Need to build a natural oxygen plant like ‘Sanjeevan Forest Park’ for human health – Ajit Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update