Pune News : भारती विद्यापीठ परिसरात व्यापाऱ्यावर गोळीबार; दुकानदार गंभीर जखमी, शहरात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील दत्तनगर भागामध्ये असलेल्या किराणा दुकानदारावर गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. यामध्ये दुकानदार गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दोन टोळ्यांमध्ये झालेल्या वादातून हवेत गोळीबार झाला होता तर आता गोळीबाराची घटना घडली असल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

पंजाबी (वय 36, पूर्ण नाव अद्याप समजलेले नाही) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी यांचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर भागातील शिवांजली चौकात किराणा दुकान आहे.

दरम्यान, काही वेळापूर्वी (रविवारी रात्री) अचानक आलेल्या काही हल्लेखोरांनी पंजाबी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गोळी लागली आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबार का झाला आणि कोणी केला हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा दुसरा गोळीबाराचा प्रकार आहे.