Pune News | पुणे महापालिकेवर पूर्वीप्रमाणे काँग्रेसचा झेंडा फडकवा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | आगामी महापालिका निवडणुकीत (PMC Elections) काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करुन पूर्वीप्रमाणे पुणे महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना (Pune News) केले.

महापालिका निवडणुकीच्या (Pune Corporation) पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी झंझावती पुणे दौरा करुन विविध भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला, मेळावे घेतले आणि जनसंपर्क कार्यालयाची उदघाटने केली. या भेटीतच पटोले यांनी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी निवडणुकीचे धोरण आणि व्यूहरचना यावर चर्चा केली. या चर्चेच्या वेळी माजी आमदार उल्हास पवार (Former MLA Ulhas Pawar), किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे, मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi), कमलताई व्यवहारे, रोहित टिळक, अभय छाजेड, विरेंद्र किराड, संजय बालगुडे, आबा बागुल, दत्ता बहिरट, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर आदी उपस्थित (Pune News) होते.

पुणे शहर हे काँग्रेसच्या राष्ट्रीय विचारांना मानणारे शहर आहे.
या शहरात आपण एकत्रितपणे जिद्दीने लढलो तर पूर्वीप्रमाणेच महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवू शकू.
मला खात्री आहे, पुण्याचे काँग्रेस कार्यकर्ते त्याच जिद्दीने लढतील, असे पटोले चर्चेत बोलताना म्हणाले.
याखेरीज पाच वर्षातील भाजपचे अपयश आणि महापालिकेतील भ्रष्टाचार जनतेसमोर मांडावा आणि लोकांना जागृत करावे,
अशा सूचनाही पटोले यांनी (Pune News) मांडल्या.

Web Title :- Pune News | Fly the Congress flag on Pune Municipal Corporation as before – Congress State President Nana Patole

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 103 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nawab Malik | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर पुन्हा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Pune Crime | सावत्र मुलावर कोयत्याने सपासप वार करुन केला खून, फरार आरोपी बापाला 3 तासात ठोकल्या बेड्या