Pune News | कामगाराच्या प्रामाणिकपणामुळे बाजारात हरवलेली ‘पट्टी’ शेतकऱ्याला परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुण्यातील मार्केटयार्ड (Pune News) येथे एका शेतकऱ्यांकडून कांदा विक्री करण्यात आली होती. त्यानंतर व्यवहार करत असताना संबधित मालाची 8 हजार 150 रुपये पट्टी झाली. दरम्यान ती पट्टी वाहनचालकाकडून हरवली गेली. तीच पट्टटी एका कामगाराला मिळाल्याने परत शेतकऱ्याला सुपुर्द करण्यात आली. यामुळे कामगाराच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात आलं.

मार्केटयार्डमधील कांदा बटाटा विभागातील शशिकांत मोरेश्वर खैरे (Shashikant Moreshwar Khaire) यांच्या गाळ्यावर पुरंदर (Purandar) तालुक्यातील बोपगाव येथील कैलास फडतरे (Kailas Phadtare) आणि राम फडतरे (Ram Phadtare) यांनी कांदा विक्री केली. त्यापोटी या शेतकऱ्यांची 8 हजार 150 रुपये पट्टी झाली. गाळाचालक योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी ही पट्टी वाहन चालकाकडे सुपूर्द केली होती. मात्र वाहनचालकाकडून पट्टी आणि पैसे बाजारात हरविले गेले. (Pune News)

त्यानंतर, तेथील वारणार ग्रुपमधील (Warner Group) हमाली काम करणाऱ्या रवींद्र सोनवणे (Ravindra Sonawane) या कामगाराला ही पट्टी सापडली. शेतकऱ्याची पट्टी असल्याने संबंधित कामगाराने आडते असोसिएशनचे अध्यक्ष बापू भोसले (Bapu Bhosle) यांच्याकडे पट्टी आणि पैसे सुपूर्द केले. त्यानंतर बापू भोसले यांनी पट्टी पाहून संबंधित अडत्यांशी संपर्क साधून पट्टी आणि पैसे त्यांच्याकडे दिले. त्यांनतर संबंधित अडत्यांने शेतकरी आणि वाहनचालक यांच्याशी संपर्क साधून पट्टी सापडली असून पैसे घेऊन जाण्यास सांगितले.

 

दरम्यान, ”बाजारातील कामगार देखील प्रामाणिक आहेत. केवळ शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून सोनवणे यांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्याची पट्टी आणून दिली. आडते असोसिएशन (Aadte Association) आणि शारदा गजानन मंडळातर्फे (Sharda Gajanan Mandal) कामगाराचा सत्कार करणार असल्याचं, आडते असोसिएशनचे अध्यक्ष बापू भोसले (Bapu Bhosle) यांनी सांगितले.

Web Title :- Pune News | Honest Farmer Market Yard Pune News


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Pune | पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ! शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

Muscle Contusion (Bruise) | कोणत्याही दुखापतीशिवाय तुमच्याही शरीरावर निळे व्रण पडतात का?, मग असू शकतो ‘या’ आजाराचा संकेत

Pune Crime | पुण्यातील सतिश बोरा अँड असोसिएट्सचे सतिश बोरा, सुजाता बोरा, पंकज बोरा यांच्यावर FIR

Debina Bonnerjee Pregnancy News | गरोदर अभिनेत्रीनं घातले हाय हिल्स, फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल ! म्हणाले – ‘हिल्स घालणं बाळाच्या आरोग्यासाठी योग्य नाही..’

Karuna Sharma Munde | ‘मी आमदाराची पत्नी आहे, एकेका आमदाराकडं किती प्रॉपर्टी असते ते मला चांगलं माहीत आहे’ – करुणा मुंडे