Pune News | शेतकर्‍यांसह सर्वांची चिंता वाढविणारा हवामान विभागाचा अंदाज

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Meteorological Department | शेतकर्‍यांसह सर्वांची चिंता वाढविणारा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) जाहीर केला आहे. मॉन्सूनचे (monsoon) वारे कमकुवत असल्याने पुढील ७ दिवस मध्य भारत, महाराष्ट्रासह (Maharashtra) दक्षिणेत मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे सांगितले आहे. याच काळात उत्तरपूर्व भारतात पावसात वाढ होण्याची शक्यता असल्याचे जाहीर केले आहे.

मॉन्सूनने यंदा नेहमीपेक्षा अगोदर आगमन केले.
आतापर्यंत त्याने देशातील बहुतांश भागात आगमन झाले आहे. राजस्थानाचा काही भाग, दिल्ली, हरियाना आणि पंजाबचा काही भागात अजून मॉन्सून पोहचला नाही.
सध्या मॉन्सूनची सीमा रेषा बारमेर, भिडवाडा, धुलपूर, अलिगड, मिरत, अंबाला आणि अमृतसर अशी आहे.
सध्या मॉन्सूनचे वारे कमकुवत असल्याने येत्या ७ दिवसात देशाच्या बहुतांशी भागात मोठ्या पावसाची शक्यता नाही.
तसेच मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

मॉन्सूनचे महाराष्ट्रात आगमन लवकर झाले असले तरी तो जसा पुढे सरकला, तसा पावसाचा जोर कमी झाला आहे.
सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे जून महिन्याच्या सरासरीपेक्षा राज्यात पाऊस अधिक झाला आहे.
देशभरात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. देशातील ६९४ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे.
२६० जिल्ह्यात खूप अधिक, १३३ जिल्ह्यात थोडा अधिक, १३९ जिल्ह्यात सरासरीइतका पाऊस झाला आहे. त्याचवेळी १३६ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, अकोला जिल्ह्यात खूप कमी पाऊस झाला आहे.

मॉन्सूनच्या चांगल्या सुरुवातीनंतर शेतकर्‍यांनी बियाणांची पेरणी केली. शेतात उगवण सुरु झाली असताना पावसाची आवश्यकता असते.
अशा वेळी पावसाने दडी मारली असल्याने पावसाअभावी पक्षी बियाणे खाण्याची शक्यता तसेच उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

Web Titel : Pune News | Meteorological Department’s forecast raises concerns for everyone, including farmers

हे देखील वाचा 

Pimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

‘डोंगर’ पोखरुन ‘उंदीर’ही नाही निघाला; परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा

कोरोना झाल्यानंतर एवढ्या दिवसांपर्यंत शरीरात राहतात अ‍ॅन्टीबॉडी, वैज्ञानिकांनी सांगितलं

या’ 5 मसाल्यांना मिसळून बनवा इम्युनिटी बुस्टर काढा, जाणून घ्या कधी अन् कसा प्यायचा