Pune News : बकर्‍या चोरण्यासाठी दुचाकी चोरायचा अन् त्याचा वापर 3 चाकीच्या चोरीसाठी, नामांकित महविद्यालयातील विद्यार्थ्यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बकऱ्या चोरीसाठी चक्क दुचाकी चोरायच्या अन त्या दुचाकीवरून पुन्हा तीन चाकी चोऱ्या करणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाला खडकी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. एका नामांकित महाविद्यालयात तो दुसऱ्या वर्गात शिकत आहे. त्यांनी पुणे जिल्हासह इतर भागातून शेकडो बकऱ्या यामाध्यमातून चोरल्या असल्याचे परिमंडळ चारचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अलेक्स लॉरेन्स ग्रेम्स (वय 19, रा. खडकी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या चार साथीदाराचा शोध घेतला जात आहे.

खडकी पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कुरेशी टोळीतील चौघांना अटक केली होती. मात्र त्यातील दोघे जण पळून गेले होते. त्याचा शोध घेतला जात होता. यावेळी उपनिरीक्षक प्रताप गिरी यांना माहिती मिळाली की, यातील अलेक्स याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, पोलीस निरीक्षक शफील पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरी व त्यांच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अनेक गुन्हे केले असल्याबाबत सांगितले. सखोल तपासात त्याच्याकडून 26 दुचाकी, 6 चार चाकी, 3 रिक्षा अशा 36 गाड्या जप्त केल्या आहेत. त्याने जवळपास 50 गुन्हे केले आहेत.

अलेक्स हा नामांकित महाविद्यालयात दुसऱ्या वर्गात शिकत आहे. तो दुचाकी चोरत असे. त्या दुचाकी साथीदार यांना देत. त्यानंतर ते या दुचाकीवरुन मोठे वाहने चोरत. या मोठ्या वाहनांमधून आरोपी हे दिसेल तिथल्या बकऱ्या चोरत. त्यांनी अश्या प्रकारे पुणे, पिंपरी, सोलापूर, अहमदनगर यासह इतर शहरात त्यांनी गुन्हे केले आहेत.