Pune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याच्या अंत्ययात्रेची रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Crime Branch Police) अटक केली. सिद्धार्थ संजय पलंगे (वय 21) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर सहकारनगर दत्तवाडी आणि बंडगार्डन पोलीस (Bundgarden Police Station) ठाण्यांमध्ये (Bundgardan Police Station) ही जबर दुखापत आणि मारामारीचे किती गुन्हे दाखल आहेत. pune crime branch police arrest criminal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा बिबवेवाडी भागात टोळक्याने धारधार हत्याराने निर्घृण खून केला होता. या खुणानंतर त्याच्या समर्थक व चाहत्यांनी सहकारनगर परिसरातून अंत्ययात्रा काढली होती. या अंत्ययात्रेदरम्यान शंभरहून अधिक दुचाकीवरून रॅली काढली गेली होती. रॅली काढण्यास सिद्धार्थ पलंगे आघाडीवर होता. याबाबत गुन्हा (FIR) दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अमलदार अमोल पवार यांना आरोपी सिद्धार्थ पलंगे हा खेड शिवापुर दर्गा जवळ मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून त्याला अटक केली.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड पोलीस कर्मचारी अमोल पवार, अजय थोरात, इमरान शेख, तुषार माळवदकर, आय्याज दद्दीकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title :- Pune News | pune crime branch police arrest criminal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पत्नीचे गंभीर आरोप !

Reserve Bank of India । नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 3 सहकारी बँकांवर RBI ची कारवाई; बारामती अन् इंदापूरच्या बँकेचा समावेश

WhatsApp ची ही आहेत टॉप सीक्रेट फिचर्स, जी बदलून टाकतील तुमच्या चॅटिंगचा अनुभव; जाणून घ्या