Pune News : तरुणीवर बलात्कार; तरुणास पोलिस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डेटिंग अँपवर ओळख करून तरुणीला भेटायला बोलावून दारू पाजत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकास वाकड पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याचे दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

अभिजित सीताराम वाघ (वय 28) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत 26 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. शनिवारी (ता. 26) काळेवाडीतील तापकीर नगर चौकात ही घटना घडली. फिर्यादी तरुणी आणि अभिजित यांची एका डेटिंग अँपवर ओळख झाली होती. त्यानंतर त्याने फिर्यादीला भेटण्यासाठी एका हॉटेलवर बोलविले. तेथे फिर्यादीला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर तिला स्वतःच्या घरी नेले. घरी गेल्यानंतर अभिजित तरुणीशी लगट करू लागला. त्यास तिने विरोध केला. तेव्हा आरोपीने तरुणीला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी अभिजित याला न्यायालयात हजर केले असता गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील स्मिता चौगले यांनी केली.