मोकळ्या जागेत लावलेल्या ट्रॅव्हल्सच्या बसेस काढण्यास सांगितल्यावरून ‘राडा’, ‘तोडफोड’ करून कर्मचार्‍यांना ‘शिवीगाळ’

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – खासगी कंपनीच्या मोकळ्या जागेत लावलेल्या टॅव्हल्सच्या गाड्या काढण्यास सांगितल्यावरून महिलांसह त्यांच्यासोबत असणार्‍या टोळक्याने तोडफोडकरून तुफान राडा घातल्याची घटना घडली. डुक्करखिंडीजवळील महामार्गालगत असणार्‍या कंपनीत हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी मनोजकुमार शिंदे (वय 45, रा. धनकवडी) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन महिला, दोन व्यक्ती आणि त्यांच्यासोबत असणार्‍या व्यक्तींविरोधातो गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची डुक्करखिंडीजवळील महामार्गालगत खासगी कंपनी आहे. कंपनीची मोकळी जागा आहे. त्यांच्याकडे वेगेवगळ्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात स्टाफ आहे. दरम्यान, कंपनीच्या जागेत आरोपींनी त्यांच्या 3 ते 4 ट्रॅव्हल्स पार्क केल्या होत्या. त्यामुळे फिर्यादींनी त्यांना ही वाहने बाहेर काढण्यास सांगितले.

याचा राग आल्याने जमाव जमवून त्यांनी फिर्यादींच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळकरून दमदाटी केली. तसेच, संरक्षण जाळी लावण्यासाठी लावलेले लोखेंडी पोल काढून टाकले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी फिर्यादींनी त्याठिकाणी जाळी बसविण्याचे काम सुरू केले असता त्याठिकाणी येऊन दगड फेक करत लावलेले लोखंडी पोल काढून टाकून नुकसान केले आहे. अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.