Pune News | वाहन खरेदी वाढली, मागील दिवाळीपेक्षा १ हजार २०० जास्त वाहनांची खरेदी; मात्र इलेक्ट्रिक वाहनांची विक्री घटली

पुणे : Pune News | दिवाळीत धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर लोक वाहनांची डिलिव्हरी घेतात. तत्पूर्वी बुकिंग केले जाते. मागील काही दिवसांपासून हे बुकिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (Pune Regional Transport Department (RTO) हद्दीत यंदाच्या दिवाळीत मागील दिवाळीपेक्षा १ हजार २५९ वाहने जास्त विकली गेली आहेत. २० हजार ८३ वाहन विक्रीची नोद आरटीओमध्ये झाली आहे. (Pune News)

पाऊसपाणी आणि इतर गोष्टी फारशा समाधानकारक नसताना ऑटोमोबाइल क्षेत्रात (Automobile Sector) मागणी वाढल्याचे दिसत आहे. ग्राहकांनी या दिवाळीत वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद दिला आहे.

दुचाकी वाहन बाजारात १०० आणि ११० सीसीची वाहने जास्त खरेदी केली जात आहेत, तर चारचाकीमध्ये एसयूव्ही कारला जास्त मागणी आहे. परंतु, कारसाठी किमान दीड ते दोन महिने वेटिंग असल्याने मुहूर्तावर वाहन उपलब्ध करून देण्याचे आव्हान वाहन विक्रेत्यांसमोर आहे. (Pune News)

दुसरीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रिक वाहनांची विक्री कमी झाली आहे. आरटीओ कार्यालयातील नोंदी पाहिल्या
असता गेल्या वर्षी ५ ऑक्टोबर २०२२ ते २२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत १ हजार ९२९ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली
होती. यंदा २४ ऑक्टोबर २०२३ ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १ हजार ७०२ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे.
म्हणजे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत २२७ इलेक्ट्रिक वाहने कमी विकली गेली.

या दिवाळीत एकूण २० हजार ८३ वाहनांची विक्री झाली आहे. यात रिक्षा, टॅक्सी आणि बसची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. दुचाकी, कार व अन्य गुड्स प्रकारातील वाहनांच्या विक्रीत मात्र मोठी तफावत नाही.

२०२२ च्या दिवाळीत मोटरसायकल १२ हजार ४१३, कार ४ हजार ५६४, गुड्स ८४४, रिक्षा ७४५, बस ४८, टॅक्सी २१०,
एकूण १८ हजार ८२४ वाहनांची विक्री झाली होती.

यंदाच्या दिवाळीत मोटरसायकल १२ हजार ९७१, कार ४ हजार ५५७, गुड्स ८६७, रिक्षा १ हजार ४५, बस ८२, टॅक्सी ५६१,
एकून २0 हजार ८३ वाहनांची विक्री झाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Khadse | ‘…तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं,’ एकनाथ खडसे यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार

Maratha Reservation | १ डिसेंबरपासून साखळी उपोषण, पण शांततेत करा, नेत्यांच्या फराळ कार्यक्रमाला जाऊ नका : जरांगेंचे आवाहन

MPSC Recruitment | भरतीच होत नसल्याने ‘एमपीएससी’ची रिक्त पदे गेली २ लाखांवर, बॅकलॉक भरायचा कसा? आयोग त्रस्त