Pune News | श्रीकांत शिरोळे, सदानंद शेट्टी, प्रफुल्ल जांभुळकर, केव्हिन मॅन्युअल यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे (Pune News) : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | पुणे महानगरपालिकेचे (pune corporation) माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे व सदानंद शेट्टी यांच्यासह वानवडी भागातील प्रफुल्ल जांभुळकर व केव्हिन मॅन्युअल यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp pune city president prashant jagtap) व पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांची उपस्थिती होती.

शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत. पुणे शहराचा विकास कणखर नेतृत्व आणि दूरदृष्टी असलेले अजितदादाच करू शकतात, यावर आमचा ठाम विश्वास आहे. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडू,’ अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी पक्षप्रवेशानंतर दिली. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून, या पक्षप्रवेशाने निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

हे देखील वाचा

Jalgaon News । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन गटात हाणामारी

Pune Crime | फरार असताना रवींद्र बऱ्हाटेने वापरलेली वाहने व मोबाईल पोलिसांकडून जप्त; पोलिस कोठडीत वाढ, बऱ्हाटेला आश्रय देणारा फरार

Anti Corruption Pune | पुणे महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | Shrikant Shirole, Sadanand Shetty, Prafulla Jambhulkar, Kevin Manuel join NCP in presence of ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update