Anti Corruption Pune | पुणे महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या (pune corporation) शालेय शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यास 50 हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (anti corruption bureau pune) रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सुरू असून, कारवाईचे कारण मात्र समजू शकलेले नाही. पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यास लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (anti corruption bureau pune) रंगेहाथ पकडल्याने प्रंचड खळबळ उडाली आहे.

सहाय्यक प्रशासकीय शिवाजी बोखारे (shivaji Bokhare) असे पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कारवाई सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी बोखारे (shivaji Bokhare) हे शालेय शिक्षण विभागात सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative Officer) आहेत. त्यांनी 50 हजाराची लाचेची मागणी केली होती. त्याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सापळा कारवाई करण्यात आली आहे. त्यांना नुकतीच 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. यामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

काही दिवसांपुर्वीच पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकार्‍याला देखील लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.
काही दिवसांच्या अंतरावर सलग अ‍ॅन्टी करप्शन विभागाने पुणे महापालिकेतील दोन अधिकार्‍यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
मनपाच्या अधिकार्‍यांची खाबुगिरी मोठया प्रमाणावर सुरू असल्याचे झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी अन्यथा टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे (Rajesh Bansode, superintendent of police) यांनी केले आहे.

Web Titel :- Anti Corruption Pune | Anti-corruption Trap in Pune Municipal Corporation, administrative officer arrested while taking bribe of Rs 50,000

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या