Pune News | समाजसेवेची बीजे बालपणापासूनच मुलांमध्ये रुजवावीत – माधुरी सहस्रबुद्धे यांचे प्रतिपादन

'वंचित विकास'तर्फे नितीन करंदीकर यांना 'सुकृत पुरस्कार' प्रदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | “समाजातील अनेक वंचित, मागास घटकातील लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यासाठी बालपणापासूनच मुलांमध्ये समाजसेवेची बीजे रुजवायला हवीत,” असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेतील (pune corporation) महिला व बालकल्याण समितीच्या माजी अध्यक्षा नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे (corporator madhuri sahasrabudhe) यांनी केले. नितीन करंदीकर (nitin karandikar) दुचाकी रुग्णवाहिकेसह गडचिरोली भागात केलेले कार्य मोलाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जाणीव व वंचित विकास संस्थेतर्फे शुभदा-सारस्वत प्रकाशन पुरस्कृत ‘सुकृत पुरस्कार’ सामाजिक कार्यकर्ते नितीन करंदीकर यांना प्रदान करण्यात आला. हिंसा व गुन्हेगारी विरोधात काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात झालेल्या या सोहळ्यात वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा (Vijay Kumar Merlecha) , कार्यवाह आणि संचालक मीना कुर्लेकर (Meena Kurlekar), संचालक सुनीता जोगळेकर (Sunita Joglekar), प्रकाशनाचे शरद गोगटे (Sharad Gogte) आदी उपस्थित होते.

दत्तवाडी भागातील (Dattawadi Area) फिरस्ती व व्यसनाधीन मुलांना व्यवसाय प्रशिक्षण देत स्वावलंबी बनवले. घरकाम करणाऱ्या महिलांनाही त्यात गुंतवले. आदमबाग, सुभाषनगर येथील मुलींचे पालकत्व स्वीकारले. कोरोनाच्या काळात रोटरी क्लब, पुणे पोलीस, वंचित विकास व अन्य संस्थांसोबत त्यांनी भरीव योगदान दिले आहे. गरजू लोकांना कॉम्प्युटर, मोबाईलही दिले. गडचिरोली, पुण्यासह ठाणे, पालघर येथील वंचित घटकांनाही त्यांनी भरीव मदत केली. हे सगळे कार्य लक्षात घेऊन वंचित विकास संस्थेने नितीन करंदीकर यांना सुकृत पुरस्काराने सन्मानित केले, असे मीना कुर्लेकर यांनी नमुद केले.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

माधुरी सहस्रबुद्धे (madhuri sahasrabudhe) म्हणाल्या, “गडचिरोली भागातील लोकांची मानसिकता आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून दुचाकी रुग्णवाहिका तयार करणे हे कौतुकास्पद आहे. यातून त्यांची जिद्द, चिकाटी आणि मदत करण्याचे साहस दिसून येते. दुसऱ्याचे दुःख आणि वेदना लक्षात घेऊन त्यावर काम करणे महत्वाचे आहे.”

नितीन करंदीकर (nitin karandikar) म्हणाले, “समाज कार्याचे बाळकडू घरातच मिळाल्याने आपण वेगळे करतोय असे वाटले नाही. बालकामगार, व्यसनाधीन मुले, महिलांवर होणारे घरगुती अत्याचार ही परिस्थिती बघून मन विषन्न होत असे. समस्येवर उपायाभिमुख काम करत गेलो. वंचित विकाससारख्या संस्था पाठीशी असल्यास सामान्य कार्यकर्ताही असामान्य कार्य करतो.”

देवयानी गोंगले (Devyani Gogle) यांनी सूत्रसंचालन केले. मीना कुर्लेकर यांनी आभार मानले.

दुचाकी रुग्णवाहिका उपयुक्त
गडचिरोली भागामध्ये रुग्णाला दवाखान्यात नेताना आदिवासी लोकांना खूप प्रवास करावा लागतो.
रुग्ण अत्यवस्थ असला तर प्रवासातच त्याचा मृत्यू होतो.
त्या लोकांचा विचार करून माझ्या अभियांत्रिकी कौशल्याचा उपयोग करून त्यांच्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका तयार केली.
आता तिथे तीन दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत आहे.
या कामात माझ्या पत्नीचीही मोलाची साथ आहे.

– नितीन करंदीकर, सामाजिक कार्यकर्ते (Nitin Karandikar, social worker)

Web Title :- Pune News | social service should be inculcated in children from childhood – Statement of Madhuri Sahasrabuddhe; vanchit vikas presents ‘Sukrut Puraskar’ to Nitin Karandikar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra Arrested | अश्लिल चित्रपट प्रकाशित प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही