पुण्यात कोकेनची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन तरूणाला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोकेन या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यास आलेल्या नायजेरियन तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली. कॅम्पमधील इस्ट स्ट्रीट रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून दीड लाखांचे 29 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.

लेवी सिदीनी मदुक्वे (वय 37, रा. 7/14, मंगल नगर, हार्ड पीस, मिरारोड (पूर्व), मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील महाविद्यालय भागात अमली पदार्थची तेजीत छुप्या पध्दतीने विक्री सुरू आहे. मात्र, त्याची माहितीच पोलिसांपर्यंत पोहचत नाही. दरम्यान गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली की, लष्कर भागातील इस्ट स्ट्रीट रस्त्यावर एकजण कोकेनची विक्री करण्यासाठी आला आहे. त्यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचून नायजेरियन तरुणाला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 29 ग्रॅम कोकेन मिळाले. त्याची 1 लाख 49 हजार रुपये किंमत आहे.