Pune NIV : पुण्यातील NIV ला मिळणार सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीचा दर्जा, आरोग्य मंत्रालयाची हालचाल सुरू; गुणवत्ता तपासणीचा मोठा अडथळा  

नवी दिल्ली : Pune NIV | विक्रमी प्रगतीसह देशात कोविड-19 विरोधी व्हॅक्सीनचे 55 कोटी डोस दिले गेले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandvia) यांनी ट्विट (tweet) करून दिली आहे. आगामी काळात लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असून यासाठी व्हॅक्सीनच्या गुणवत्तेच्या चाचणीसाठी मंत्रालयाने हैद्राबादच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ अ‍ॅनिमल बायोटेक्नॉलॉजीला नॅशनल ड्रग लॅबोरॅटरीचा दर्जा दिला आहे. आता आरोग्य मंत्रालय (Ministry of Health) पुण्यातील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (National Institute of Virology) Pune NIV ला सुद्धा सेंटल ड्रग लॅबोरेटरीचा दर्जा (status of Central Drug Laboratory) देण्याच्या तयारीत आहे. यामुळे व्हॅक्सीन (Corona Vaccine) चे उत्पादन आणि आणि पुरवठ्यात होणारा अनावश्यक उशीर टाळता येईल.

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना इशारा, म्हणाले – ‘… तर तुमची पोलखोल करणार’

महत्वाचे म्हणजे देशातील बहुतांश डोस पुणे आणि हैद्राबादमध्ये तयार होत आहेत, परंतु ते गुणवत्ता तपासणीसाठी हिमाचल प्रदेशात कसौली येथील सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीमध्ये पाठवावे लागतात. गुणवत्ता योग्य आढळल्यानंतरच ते राज्यांना वापरण्यासाठी दिले जातात. यासाठी आरोग्य मंत्रालय पुण्यातील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीला सुद्धा सेंटल ड्रग लॅबोरेटरीचा देण्याच्या तयारीत आहे. यामुळे व्हॅक्सीनचे उत्पादन आणि आणि पुरवठ्यात होणारा अनावश्यक उशीर टाळता येईल.

देशात सुरू असलेल्या लसीकरणासाठी जवळपास 15 कोटी डोस एकटी सीरम इन्स्टीट्यूट (Serum Institute, Pune) उपलब्ध करत आहे, तर भारत बायोटेक तीन कोटी डोस देत आहे. स्पुतनिक-व्हीचे सुद्धा जवळपास एक कोटी डोस मिळण्याची अपेक्षा आहे, परंतु त्यांच्या पुरवठ्याची अनिश्चितता पाहता लसीकरण अभियानाच्या लक्ष्यात त्यास सहभागी केलेले नाही.

आरोग्य मंत्रालयाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलैच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या
आठवड्यात प्रतिदिन एक कोटी डोसपेक्षा जास्त द्यायचे होते. परंतु भारत बायोटेकच्या बेंगळुरु युनिटच्या गुणवत्तेच्या कमतरतेमुळे उत्पादन सुरू न होऊ शकल्याने हे लक्ष्य साध्य करता आले नाही. वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनच्या उत्पादनाचे मोठे युनिट हेच आहे. या युनिटमधून आता ऑगस्टच्या अखेरपर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

हे देखील वाचा

ATM Fraud | ATM फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी ठवा लक्षात, होणार नाही फसवणूक, जाणून घ्या

Mumbai Corona | एप्रिल 2020 च्यानंतर मुंबईत समोर आली एका दिवसातील कोरोनाची सर्वात कमी प्रकरणे, जाणून घ्या

IND vs ENG | Jasprit Bumrah-Mohammed Shami ने इंग्लंडला असा दिला धक्का, वेगवान फलंदाजीने मॅचला दिली कलाटणी

Fuel Price | अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले, अखेर का कमी केल्या जात नाहीत इंधनाच्या किमती, हे आहे कारण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune NIV: NIV in Pune to get Central Drug Laboratory status, Health Ministry starts operations; A major hurdle for quality inspection

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update