गुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संचारबंदी आणि गुटखा बंदी असताना शहरात चोरून गुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून 5 हजार 872 रूपयांचा गुटखा जप्त केला आहे.

याप्रकरणी दुकानमालक जगदीश हरगुडे (वय 32, रा. शिवदर्शन, पर्वती) याच्या विरोधात दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशभरात कोरोना आजाराने थैमान घातला आहे. त्यामुळे शहरात संचारबंदी आणि वाहन बंदी करण्यात आली आहे. तत्पूर्वी राज्यात गुटखा बंदी आहे. पण त्याची विक्री जोमात सुरू आहे. दरम्यान पोलीस आयुक्तांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान पर्वती येथील शिवदर्शनमध्ये असणाऱ्या जोगेश्वरी प्रोव्हिजन स्टोअरमध्ये बेकायदा पद्धतीने गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकारी यांच्या मदतीने या दुकानावर छापा मारला. त्यावेळी विक्री करण्यास बंदी असलेला आरएमडी गुटखा, विमल गुटखा, पान मसाला, असा माल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक भालचंद्र ढवळे, उपनिरिक्षक किशोर शिंदे, रोहिदास लवांडे, संदिप राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like