Pune : ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकल्याने एकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. ट्रकला धडकल्यानंतर त्यांच्या अंगात सळई घुसल्या होत्या. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. वडगाव बुद्रूकमध्ये ही घटना घडली आहे.

अतुल सुधीर कांबळे (वय ४५, रा. वरळी, मुंबई ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जहांगिर अकबर मुजावर (वय ४५, रा. दहिसर मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सिहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास जहांगिर ट्रकमधून बेजाबदाररित्या लोखंडी सळईची वाहतूक करीत होता. त्यावेळी वडगाव बुद्रुक परिसरातून अतुल हे दुचाकीवर घरी चालले होते. अंधारात त्यांना ट्रकमधील सळया दिसल्या नाहीत. त्यामुळे तेे ट्रकला धडकले आणि त्यांच्या अंगात सळया घुसल्या. त्यात त्याांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. डी. साळुंखे करीत आहेत.