पुणे : गोल्ड लोणच्या दरोड्यात 1 कोटीहून अधिक सोने लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-नगर रस्त्यावरील आयआयएफएल गोल्ड लोणच्या कार्यालयात भल्या सकाळी पिस्तुल धाऱ्यांनी टाकलेल्या दरोड्यात 1 कोटींहून अधिक सोने नेल्याचे समोर आले आहे. भरदिवसा घडलेल्या शस्त्रत दरोड्याने शहरात खळबळ उडाली आहे. तर पंधरा दिवसातील ही दुसरी घटना घडल्याने पोलीसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तर व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी मनिषा मोहन नायर (वय २९,रा. येरवडा ) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील भाजी मार्केट परिसरातील आनंद इम्पायर इमारतीच्या तळमजल्यावर आयआयएफएल कंपनीच्या गोल्ड लोणचे कार्यालय आहे. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्याने कार्यालय उघडले होते. त्यानंतर पावणे अकराच्या सोने तारण ठेउन गोल्ड लोण घेण्याच्या बहाण्याने एकजण कार्यालयात शिराला. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ दोन व्यक्ती कार्यालयात दाखल झाल्या.  त्यावेळी गोल्ड लोण कार्यालयात  दोन महिला व एक पुरूष काम करत होते. त्यावेळी चोरट्यांनी कार्यालयातील कामगाराच्या डोक्याला पिस्तूल लावले. त्यानंतर तिजोरीतील सोने पिशवीत भरण्यास सुरूवात केली. अवघ्या काही मिनिटात चोरट्यांनी कोट्यावधी रुपयांचा ऐवज चोरुन पळ काढला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस  निरीक्षक शंकर खटके अधिक तपास करीत आहे.

दरम्यान यातील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून, पोलीस त्यावरून आरोपींचा शोध घेत आहेत.

Loading...
You might also like