Pune Pimpri Chinchwad Crime | केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने दोन लाखांची फसवणूक, कासारवाडी मधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | एचडीएफसी बँकेची (HDFC Bank) केवायसी (KYC) माहिती अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) एकाला ऑनलाईन दोन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कासारवाडी येथील (Pune Pimpri Chinchwad Crime) विकास नगर येथे गुरुवारी (दि.2) दुपारी एकच्या सुमारास घडला आहे.

 

याप्रकरणी यूसुफ जब्बार शेख Yusuf Jabbar Shaikh (वय-37 रा. विकास नगर, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध आयपीसी 420, 465, 467, 471 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईलवर आरोपीने केवायसी अपडेट करण्याचा खोटा एसएमएस पाठवला. यामध्ये तक्रारदार यांच्या मोबाईलवर लिंक पाठवून क्लिक करण्यास सांगितले.
फिर्य़ादी यांनी लिकवर क्लिक केले असता एचडीएफसी बँके सारखे पेज ओपन झाले.
यामध्ये फिर्यादी यांनी त्यांची व बँक खात्याची सर्व माहिती भरली.
त्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 1 लाख 99 हजार 778 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करुन आर्थिक फसवणूक (Cheating) केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | 2 lakhs fraud on the pretext of updating KYC, type in Kasarwadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा