Pune Pimpri Chinchwad Crime | टेलिग्रामद्वारे मेसेज करुन इंजिनीयर महिलेची 20 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | ऑनलाइन काम (Online Work) करुन दिवसाला 5 ते 8 हजार रुपये मिळतील, असे सांगून एका इंजिनियर (Engineer) महिलेला 20 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी महिलेला टेलिग्रामद्वारे (Telegram) मेसेज करुन वेगवेगळे टास्क देऊन 20 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक (Cheating) केली. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) 8 फेब्रुवारी 2023 रात्री साडेदहा ते 11 फेब्रुवारी सकाळी साडेअकरा या वेळेत हिंजवडी येथे महिलेच्या राहत्या घरात घडला आहे.

 

याबाबत आयटी इंजिनियर असलेल्या 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन महिलांसह सहा खातेधारकांवर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) आहेत. त्यांना आरोपी महिलेने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून झेल्थ डिजिटल एजन्सी (Zelth Digital Agency), इंडिया ग्लोबल मीडियात (India Global Media) तुमच्यासाठी चांगल्या ऑफर असून तुम्ही काम करण्यास इच्छुक आहात का, असे विचारले. (Pune Pimpri Chinchwad Crime)

 

तसेच त्यासाठी प्रत्येक दिवसाला 5 ते 8 हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवले.
त्यानंतर टेलिग्रामद्वारे मेसेज करुन फिर्यादी यांना वेगवेगळे टास्क देण्यात आले.
तसेच आरोपींच्या वेगवेगळ्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले.
फिर्य़ादी यांनी आरोपींनी सांगितल्या प्रमाणे वेगवेगळ्या खात्या 20 लाख 15 हजार रुपये पाठवले.
यानंतर आरोपींनी कोणत्याही प्रकराचा परतावा न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : – Pune Pimpri Chinchwad Crime | 20 lakh fraud of an engineer woman by sending a message through Telegram, an incident in Hinjewadi area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिल परब यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘त्यामुळे हा खटला…’

Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)