Pune Pimpri Chinchwad Crime | अटक केलेल्या आरोपीकडून दोन पोलिसांना मारहाण, वाकड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी घेवून जाताना आरोपीने दोन पोलिसांना हाताने मारहाण (Beating) करत चावा घेतला.
तसेच नखाने ओरखडून जखमी केले. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) शुक्रवारी (दि.24) दुपारी एकच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात (Konkane Chowk) घडला. याप्रकरणी एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस हवालदार संतोष मारुती बर्गे Police constable Santosh Maruti Barge (वय-44) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खंडू जालिंदर लोंढे Khandu Jalindar Londhe (वय-23 रा. रहाटणी) याच्यावर आयपीसी 353, 332 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बर्गे आणि त्यांचे सहकारी पोलीस शिपाई खेडकर हे शुक्रवारी दुपारी
गस्त घालत होते. ते कोकणे चौकात आले असता त्यांना वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील
फरार आरोपी खंडू लोंढे हा चौकात दिसला. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला गुन्ह्यच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात चल असे म्हणाले. त्याला नकार देत आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी पोलीस हवालदार बर्गे आणि पोलीस शिपाई खेडकर यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी त्याने दोघांना हाताने मारहाण केली. बर्गे यांच्या दोन्ही हातावर नखाने ओरखडले.
तसेच दोघांच्या हाताला मनगटाजवळ जोरात चावा घेतला.
आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Arrested accused beat up two policemen, incident in Wakad area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani News | परभणीचे खासदार संजय जाधव यांना दुसऱ्यांदा जिवे मारण्याची धमकी; राजकीय क्षेत्रात उडाली खळबळ

BJP MLA Nitesh Rane | राहुल गांधीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पाकिस्तानात हकलून द्या, आमदार नितेश राणेंचा घणाघात