Pune Pimpri Chinchwad Crime News | खराडीतील पिटर इंग्लंड दुकानात चोरी, पावणे 5 लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे शहरामध्ये घरफोडीच्या (Burglary) गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. चोरट्यांकडून बंद फ्लॅट टागर्गेट केले जात आहे. बंद घरातून सोन्या-चांदीचे दागिने (Gold-Silver Jewellery) तसेच रोख रक्कम (Cash) चोरून नेल्याच्या घटना घडत आहेत. अशातच चोरट्यांनी खराडी मधील पिटर इंग्लंड या प्रसिद्ध कापड दुकानातून (Peter England Shop) लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना खराडी बायपास रोडवरील (Kharadi Bypass Road) पिटर इंग्लंड दुकानात सोमवारी (दि.25) पहाटे तीन ते पाच या कालावधीत घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पंकजकुमार नरेशकुमार यादव (रा. केसनंद रोड, वाघोली) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अज्ञात चोरट्या विरोधात आयपीसी 457, 380 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव हे खराडी बायपास रोडवरील पिटर इंग्लंड या दुकानात कामाला आहेत. दुकान बंद असताना चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप लावलेली लोखंडी पट्टी कापून शटर उघडले. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन रोख रक्कम व दुकानातील कपडे असा एकूण 4 लाख 64 हजार 198 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आंबेगाव येथे दागिने व रोकड लंपास

चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन 72 हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली.
हा प्रकार बुधवारी (दि.27) दुपारी साडे तीन ते सायंकाळी सहा या दरम्यान शिव-द्रौपदी अपार्टमेंट, दत्तनगर चौक, आंबेगाव बु. येथे घडला आहे. याबाबत सुरेंद्रकुमार मदनलाल प्रजापती यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले होते.
चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी बेडरुम मधील पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 74 हजार रुपयांचा मुद्देमाल
चोरून नेला. फिर्य़ादी सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर (PSI Mohan Kalamkar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Crime News | बालसुधारगृहातून पळालेल्या मुलांचा नागपूर, गोंदियात राडा; पोलिस शिपायाला केले जखमी, गोंदियात पोलीस व्हॅनची तोडफोड, रिक्षाचालकाला लुटले

Jayant Patil On BJP | ”राम मंदिर कोणत्याही एका पक्षाची प्रॉपर्टी नाही”, निमंत्रणाच्या राजकारणावरून जयंत पाटलांची भाजपावर टीका

Pune Traffic Updates | कोरेगाव भिमा – पेरणे फाटा: विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल